प्री-मॉन्सून कपाशीच्या क्षेत्रात अतिपावसाने बोंडांमधून अंकुरले कोंब
प्री-मॉन्सून कपाशीच्या क्षेत्रात अतिपावसाने बोंडांमधून अंकुरले कोंब 
मुख्य बातम्या

प्री-मॉन्सून कपाशीच्या क्षेत्रात अतिपावसाने बोंडांमधून अंकुरले कोंब

टीम अॅग्रोवन

अकोला  ः या भागात गेल्या एक महिन्यापेक्षा अधिक दिवस सातत्याने पाऊस झाल्याने कापूस पिकाला जोरदार तडाखा बसला आहे. प्रामुख्याने प्री-मॉन्सून कपाशीच्या क्षेत्रात काही ठिकाणी बोंडांमधून कोंब बाहेर निघाल्याचे काही ठिकाणी समोर आले आहे. सातपुड्याला लागून असलेल्या कापूस पट्ट्यात अतिपावसामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद पिकांचे नुकसान झाले. आता कापूस पिकाचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वहंगामी कपाशीमध्ये बोंड्या परिपक्व झाल्या असून त्यातून कापूस उमलू लागला. मात्र सतत पाऊस झाल्याने बोंडे कुजली. त्यातूनही अंकुर बाहेर निघत आहेत. याचा परिणाम कापसाच्या दर्जावर होत आहे. प्री-मॉन्सून कपाशीमध्ये पहिल्या तीन वेचण्यांमधून निघणारा कापूस दर्जेदार समजल्या जातो. आता याच वेचण्या खराब होत असल्याने उत्पादनावर निश्चित परिणाम होईल, असे शेतकरी सांगत आहेत. अकोला, बुलडाणा या दोन्ही जिल्ह्यात या हंगामात कपाशीचे लागवड क्षेत्र वाढलेले आहे. अकोट तालुक्यातील बोर्डी येथील विष्णू रामदास पखाले यांनी तीन एकरात लागवड केली होती. त्या कपाशीमध्ये बोंडामधून अंकुर बाहेर पडले आहेत. संग्रामपूर तालुक्यात लाडणापूर शिवारात प्रमोद राहणे यांच्या शेतातही मोठ्या प्रमाणात असेच अंकुर आले आहेत. प्री-मॉन्सून लागवड असलेल्या क्षेत्रात ३० टक्क्यांपर्यंत पावसामुळे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. 

आमच्या कुटुंबाने २० मे रोजी चार एकरांत कापसाची लागवड केली. आमच्या तालुक्यात अतिपाऊस झाल्याने इतर पिकांसोबतच कापसाचे मोठे नुकसान झालेले आहे. प्रत्येक झाडावर ३० ते ४० टक्के बोंडे खराब झाली. काही बोंडांमधून कोंब बाहेर आले. या कापसाची नुकतीच वेचणी केली. सध्या कोणीही त्याला घ्यायला तयार नाही. कापसाची मागणीसुद्धा व्यापारी अवघे दोन हजार रुपये क्विंटलपासून करीत आहेत.  - प्रमोद राहणे, लाडणापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT