sharad pawar
sharad pawar  
मुख्य बातम्या

पोल्ट्री उद्योगाच्या समस्या केंद्रकडे मांडणार

टीम अॅग्रोवन

नाशिक: सोशल मीडियावरील ‘कोरोना’विषयक अफवांमुळे राज्यातील पोल्ट्री उद्योग मोठ्या आर्थिक कोंडीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोल्ट्री फार्मर्स व ब्रीडर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुंबई येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी श्री. पवार यांनी पोल्ट्री व्यावसायिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. याप्रश्नी श्री. पवार पुढील आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची असोसिएशनच्या शिष्टमंडळाशी भेट घडवून आणणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे सचिव उद्धव अहिरे यांनी दिली.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये नुकतीच पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, आमदार रोहित पवार तसेच श्री. पवार यांची असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन समस्यांबाबत चर्चा केली. २००६ मध्ये बर्ड फ्लूने मोठे थैमान घातले होते. त्या वेळी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या मध्यस्थीतून केंद्र व राज्य सरकारने मदत दिली होती. अशाच मदतीची आता अपेक्षा आहे. बर्ड फ्लूच्या धर्तीवर पोल्ट्री व्यावसायिकांना मदत करण्यासाठी समिती स्थापन करावी, पोल्ट्री व्यावसायिकांवरील आपत्ती ही राष्ट्रीय असल्याने अनुदानातील भार उचलावा, अशी विनंती या वेळी करण्यात आली. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष सी.वसंतकुमार, उपाध्यक्ष श्रीकृष्ण गांगुर्डे, राजेंद्र थोरात, नबाजी काळभोर, पांडुरंग सांडभोर, डॉ. प्रसन्न पेडगावकर, श्‍याम भगत आदी चर्चेत सहभागी झाले होते. प्रमुख मागण्या  

  • सरकारने प्रतिपक्षी १०० रुपये नुकसानभरपाई अनुदान द्यावे.
  • वीजबिले माफ करण्यात यावीत.
  • शालेय मध्यान्ह भोजनात अंडी समाविष्ट करण्यात यावी. 
  • ग्रामपंचायत स्तरावरील व्यवसायाचा कर माफ करण्यात यावा. 
  • कुक्कुटपालन व्यवसायास अर्थसहाय्य करणाऱ्या संस्थांच्या खेळत्या भांडवलाचे पुनर्गठन करून दीर्घकालीन कर्जामध्ये करून एक वर्षाचा अधिस्थगन कालावधी द्यावा.
  •  नवीन खेळते भांडवल द्यावे.
  •  खेळत्या भांडवलावरील कर्जमाफ करून येत्या वर्षांसाठी ४ टक्के व्याजदर आकारण्यात यावा.
  •  कुक्कुटपालन बोर्डाची स्थापना करा.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT