pomegranate rate slept
pomegranate rate slept  
मुख्य बातम्या

डाळिंबाचे दर दोन आठवड्यांत ६० रुपयांनी घसरले

Abhijeet Dake

सांगलीः अतिरिक्त पावसाने डाळिंब बागांमध्ये पाणी साचले. त्यामुळे गोडी कमी झाली. त्यातच थंडी आणि दव पडल्याने डाळिंबावर डाग पडत आहेत. परिणामी, डाळिंबाचा दर्जा म्हणजे कमी झाला असल्याने मागणी कमी झाली आहे, असे सांगत व्यापाऱ्यांनी दर पाडले आहेत. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ९० रुपयांवर असणारा डाळिंबाचा दर सध्या ३० ते ५० रुपये झाला आहे. डाळिंब दरात केवळ दोन आठवड्यांत किलोमागे ४० ते ६० रुपयांची घसरण झाली. परिणामी, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी या संकटांना समर्थपणे तोंड देऊन उत्पादन घेतलेल्या शेतकरी यामुळे घायकुतीला आले आहेत.  

डाळिंब पट्ट्यात गेल्यावर्षी पडलेल्या दुष्काळामुळे सुरुवातीपासूनच टॅंकरने पाणी देऊन बागा जगवल्या. यंदा पावसाने बहुतांश भागात उशिरा सुरुवात केली. त्यातच आधीच पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने काहीसा दिलासा दिला, पण गेल्या पंधरवड्यापासून मॉन्सूनोत्तर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासाऐवजी सर्वाधिक नुकसानीला सामोरे जावे लागले. 

सध्या मृग हंगामातील डाळिंबाची काढणी सुरू झाली आहे. गणपतीनंतर मृग हंगामातील डाळिंब हंगामाची सुरुवात होते. मात्र, यंदा पावसाने डाळिंब बागांचे मोठे नुकसान त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा यंदा अधिक दर मिळतील अशी आशा होती. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात डाळिंबाला ९० ते ११० रुपये किलो असा दर देखील मिळाला. परंतु, हा दर दीर्घकाळ टिकू शकला नाही. व्यापाऱ्याकंडून दररोज १० ते १५ रुपयांनी दर कमी होऊ लागला. आठ दिवसांतच डाळिंबाच्या दरात घसरण झाली. अगोदर आर्थिक तोटा सहन झाला आहेत, त्यातच कमी दर झाल्याने आर्थिक तोटा कसा भरून निघणार, असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे. डाळिंब तडकू लागले डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी डाळिंबाचा चांगला दर्जा टिकवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, सध्या सकाळी पडणारी थंडी आणि दुपारी वाढती उष्णता यामुळे डाळिंब फळ झाडावरच तडकू लागले आहेत. परिणामी, पुन्हा उत्पादन घट होणार आहे. डाळिंबाचा आकार मोठा झाला पण वजन मिळत नाही. दर नाहीत आणि फळाला वजनही नाही आणि डाळिंब तडकणे असा तिहेरी फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. व्यापाऱ्यांकडून दराची कोंडी डाळिंबाचा दर्जा चांगला नाही. बाजारात डाळिंबाची मागणी नाही, असे कारण व्यापारी सांगून कमी दरात खरेदी सुरू आहे. असा दबक्या आवाजात शेतकऱ्यांच्यात चर्चा सुरू आहे. गोडवा कमी होण्याची कारणे

  • डाळिंबात साखर उतरतेवेळी पाणी अधिक झाले.
  • जमिनीतील ओलावा कमी झाला नाही
  • सकाळी दहा पर्यंत दव असल्याने परिणाम 
  • प्रतिक्रिया मृग हंगामातील डाळिंब सुरू झाले आहे. मात्र, यंदा अपेक्षित उत्पादन आणि दरही नाहीत. उत्पादन खर्चही निघणार नाही. त्यामुळे कर्जमुक्त होणे मुश्कील झाले आहे.   - जालिंदर पाटील, डाळिंब उत्पादक शेतकरी, आटपाडी वास्तविक नोव्हेंबरमध्ये डाळिंबाला मागणी कमीच असते. परंतु, अतिरिक्त पावसामुळे डाळिंबाची गुणवत्ता कमी झाली आहे. त्यामुळे मागणी कमी आहे. डिसेंबरनंतर डाळिंबाची मागणी वाढून दर वाढतील अशी आशा  आहे. - नामदेव सरगर, डाळिंब व्यापारी, आटपाडी.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT