pomegranate
pomegranate  
मुख्य बातम्या

डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत मुदत 

टीम अॅग्रोवन

सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत मृग बहर २०२१-२२ विमा अर्ज भरण्याला सुरुवात झाली आहे. द्राक्ष, पेरू, लिंबू व चिकूसाठी ३० जून आणि डाळिंबासाठी १४ जुलै २०२१ पर्यंत मुदत आहे. शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे. 

कर्जदार, बिगर कर्जदारांसाठी विमा योजना ऐच्छिक आहे. भाडेपट्टीने शेती करणारेही योजनेसाठी पात्र आहेत. फळपिकासाठी ४ हेक्टरपर्यंत मर्यादा आहे. मृग अथवा आंबिया बहरापैकी एकाच हंगामासाठी विमा अर्ज करता येईल. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा कवच लागू असेल. उत्पादनक्षम अधिसूचित वय डाळिंब, द्राक्ष २ वर्षे, पेरू ३ वर्षे, लिंबू ४ वर्षे, व चिकू ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षण घेतल्याचे निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल.  ...अशी आहे मुदत  पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी विमा हप्ता भरण्यासाठी नव्या आदेशानुसार तारखाही जाहीर करण्यात आल्या असून, त्यात शेतकऱ्यांनी (कर्जदार वा बिगर कर्जदार) योजनेतील सहभागासाठी यंदाच्या मृग बहरासाठी द्राक्षासह संत्रा, पेरू, लिंबू, मोसंबी, चिकू या फळांसाठी ३० जून ही अंतिम तारीख आहे. तर डाळिंबासाठी १४ जुलै ही तारीख आहे. आंबिया बहारासाठी द्राक्षासाठी १५ ऑक्टोबर, मोसंबी, केळी, पपईसाठी ३१ ऑक्टोबर, संत्रा, काजू, आंब्यासाठी (कोकण विभाग) ३० नोव्हेंबर अंतिम तारीख असेल. तर इतर जिल्ह्यातील आंब्यासाठी ३१ डिसेंबर आणि डाळिंब, स्ट्रॉबेरीसाठी १४ ऑक्टोबर ही तारीख अंतिम असेल.  फळपीकनिहाय संरक्षित रक्कम आणि शेतकरी हप्ता (हेक्टरी) 

पीक संरक्षित रक्कम शेतकरी हप्ता
चिकू ६० हजार ३ हजार 
द्राक्ष ३.२० लाख १६ हजार 
डाळिंब १.३० लाख ६,५०० 
लिंबू ७० हजार ६,३०० 
पेरू ६० हजार ३ हजार

...असा करा अर्ज  सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी बॅंक खाते असणाऱ्या जवळच्या प्राधिकृत बँका, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, संबंधित विमा कंपनीची कार्यालये किंवा विमा प्रतिनिधींशी संपर्क साधून विमा प्रस्ताव विहित प्रपत्रात योग्य त्या विमा हप्त्यासह, ७/१२ खाते उतारा, आधार कार्ड, बँक खात्याचे तपशील, घोषणापत्र, बागेबाबत छायाचित्र अक्षांश- रेखांश पत्र आदी कागदपत्रांसह विहित वेळेत जमा करावे.  प्रतिक्रिया योजनेअंतर्गत विहित मुदतीत नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी व दायित्व विमा कंपन्यांची असून नुकसानभरपाई देण्याची कोणतेही दायित्व शासनावर नाही. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.  - बसवराज मास्ताळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

Onion Export Policy : अस्थिर कांदा धोरणांचे उमटणार राजकीय पडसाद

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

SCROLL FOR NEXT