'राज्यातील पोलीस पाटील, ग्रामसेवकांनाही विमा कवच द्या'
'राज्यातील पोलीस पाटील, ग्रामसेवकांनाही विमा कवच द्या' 
मुख्य बातम्या

'राज्यातील पोलीस पाटील, ग्रामसेवकांनाही विमा कवच द्या'

टीम अॅग्रोवन

बुलडाणा : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना या संसर्गजन्य विषाणू सोबत लढण्याकरिता शासकीय यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. या संसर्गजन्य विषाणू सोबत लढणाऱ्या आरोग्य यंत्रणेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना शासनाने जीवन विम्याचे सुरक्षा कवच दिले आहे. गावपातळीवर काम करणाऱ्या ग्रामसेवक तसेच पोलीस पाटील यांनाही शासनाने विमा सुरक्षा कवच लागू करावे, अशी मागणी मलकापूरचे आमदार राजेश एकडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांकडे केली आहे.

याबाबत आ. एकडे यांनी म्हटले की, सद्य परिस्थितीत पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक व सुरत अशा ठिकाणी महत्त्वासाठी गेलेले ग्रामीण भागातील अनेक कुटुंब आपापल्या गावात परतले आहेत. यासर्वांचे क्वारंटाईन करून घेतले जात आहे. यामुळे पोलीस पाटील व ग्रामसेवक यांचा बाहेरून आलेल्यांशी संपर्क येत आहे. पीपीई कीट उपलब्ध नसल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न उपस्थित होत आहे. अशा स्थितीत पोलीस पाटील व ग्रामसेवकांनाही आरोग्य विम्याचे कवच देण्यात यावे, अशी मागणी एकडे यांनी दिली आहे.

असे करावे लागते काम...

  • बाहेरून आलेल्यांच्या कुटुंबांची नोंद करणे
  • या नागरिकांच्या हातावर शिक्के मारणे
  • आवश्‍यक असल्यास विलगीकरण करून त्यांना १४ दिवस घराबाहेर पडू न देणे
  • त्यांच्या तब्येतीकडे लक्ष पुरविणे गावात फवारणी करून घेणे
  • गावात दवंडी देणे व वेळोवेळी त्यांचे अहवाल, महसूल, पोलीस व आरोग्य विभागाला सादर करणे
  • या सोबतच कलम १४४ ची अंमलबजावणी करणे, गावात गर्दी जमू न देणे
  • लोकांना घरात राहण्याचे आव्हान करणे,
  • जमावबंदी-संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करणा-या लोकांची माहिती प्रशासनास देणे 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले

    Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

    Indian Spices : भारतीय मसाल्यांच्या बदनामीचे षडयंत्र

    Turmeric Processing : विडालय टरमरीक प्रोसेसींग क्‍लस्टरसाठी दहा कोटींची तरतूद

    Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा

    SCROLL FOR NEXT