नाशिक : सिन्नर तालुक्यातील ४४ गावांतून चोरी गेलेले १८ वीजपंप पोलिसांनी हस्तगत केले आहेत. ग्रामरक्षक दलाच्या मदतीने पोलिसांनी ही कारवाई केली असून, दोघा चोरट्यांसह त्यांच्याकडून चोरीच्या मोटारी विकत घेणाऱ्या भंगार व्यावसायिकास देखील बेड्या ठोकल्या आहेत. वावी परिसरात वीजपंप चोरीच्या संदर्भात शेतकऱ्यांकडून पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. रात्रीच्या वेळी वीजपंप चोरी होत असल्याने चोरट्यांचा माग काढणे अवघड बनले होते. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वावी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्या पथकाने चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू केला. पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व गावामध्ये होतकरू तरुणांचे ग्रामरक्षक दलाची पुन्हा स्थापना केली. याच ग्रामरक्षक दलातील सदस्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कोते यांनी तपासाची चक्रे फिरवून कोळपेवाडी (ता. कोपरगाव) येथील रवी अबरसिंग मुळेकर (वय ३१), निकेश अशोक कोळेकर (वय १९) या दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे मोटर चोरीबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. पण त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी मोटर चोरीबाबत कबुली दिली. चोरी केलेल्या मोटरी या भंगार व्यापारी वशीर फतु शेख, रा. कोळगावमाळ (ता. सिन्नर) यांना विक्री केल्याचे सांगितले. वावी पोलिसांनी वशीर फतु शेख याच्या खरी जाऊन घरझडती घेतली असता विक्रीच्या उद्देशाने १८ इलेक्ट्रिक मोटारीचे मोकळे केलेले सुट्टे पार्ट आढळून आले. पोलिस नाईक दशरथ मोरे, नितीन जगताप, पंकज मोढे, प्रकाश उंबरकर, सोपान शिंदे, गोविंद सूर्यवाड यांनी कारवाईत सहभाग घेतला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.