हमीभावाच्या मुद्द्यावरून गैरसमज पसरवले जात आहेत
हमीभावाच्या मुद्द्यावरून गैरसमज पसरवले जात आहेत 
मुख्य बातम्या

हमीभावाच्या मुद्द्यावरून गैरसमज पसरवले जात आहेत

टीम अॅग्रोवन

नवी दिल्ली : उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव देण्याविषयी आम्ही कटिबद्ध; मात्र उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव देण्याविषयी आमच्या निर्णयावर अनेकजण गैरसमज पसरवत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.  कृषी प्रगती मेळावा, कृषी कर्मन पुरस्कार आणि शेतीमालासाठीच्या ई-पोर्टलचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (ता. १७) येथे करण्यात आला, या वेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. याप्रसंगी शेतकरी, शास्त्रज्ञ आणि राज्यांना विशेष योगदानासाठी गौरविण्यात आले.  पंतप्रधान म्हणाले...

  • स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या देशाची अन्नधान्याची स्थिती कठीण होती. मात्र, आपल्या अन्नदात्याने हे आव्हान पेलले आणि आज आपल्याकडे विक्रमी उत्पादन होत आहे.
  • देशात कृषी बाजार सुधारणा, ई-मार्केटिंग पोर्टलला आज प्रांरभ होत आहे. शेतीमालाची माहिती शेतकऱ्यांसह ग्राहकांनाही उपलब्ध होणार.
  • सेंद्रिय शेतीसाठी मी स्वतः आग्रही आहे. देशात २२ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती होते. भारत सेंद्रिय उत्पादन घेणारा सर्वांत जुना देश.
  • देशभरातील कृषी विज्ञान केंद्रे ही ‘लाइट हाउस’ अाहेत. कृषी क्षेत्राला प्रकाशमान करण्याची या केंद्रांवर जबाबदारी. या केंद्रांनी शेतकऱ्यांपर्यंत शेती तंत्रज्ञान पोचवावे.
  • मधुमक्षिका पालनाकडे शेतकऱ्यांनी आवर्जून लक्ष द्यावे.
  • शेतकऱ्यांना सोलर शेतीची नवी संधी आहे. स्वतःकरिता वीज उपलब्ध करून ती सरकारलाही विकता येणार आहे.
  • शेतीमालाचे अवशेष जाळू नका. यास शेतीतच गाडून खत करा. पिकांना याचा फायदा होतो.
  • आजही भारत हजारो कोटी रुपये बांबू आयातीसाठी खर्च करत आहे. आपण जर बांधावर बांबू लागवड केली, तर देशाचा मोठा खर्च कमी होईल.
  • देशभरातील शेतकऱ्यांनी युरियाचा वापर कमीत कमी करावा.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT