अहमदाबाद, गुजरात ः कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी (ता.१२) येथील श्री जगन्नाथ मंदिरात पूजा केली.
अहमदाबाद, गुजरात ः कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी (ता.१२) येथील श्री जगन्नाथ मंदिरात पूजा केली. 
मुख्य बातम्या

पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांबाबत बोलत नाहीत ः राहुल गांधी

टीम अॅग्रोवन

अहमदाबाद, गुजरात  ः गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी (ता.१२) कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अहमदाबादमधील श्री जगन्नाथ मंदिरात जाऊन पूजा केली. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

‘‘गुजरातमधील लोक अतिशय बुद्धिमान अाहेत. पंतप्रधान मोदी प्रचारदौऱ्यात भ्रष्टाचार अथवा शेतकऱ्यांबाबत बोलत नाहीत, हे गुजरातमधील लोकांनी पहावे,’’ असे राहुल गांधी यांनी म्हटले अाहे. ‘‘मी जेव्हा मंदिरात जातो; तेव्हा मी गुजरातमधील लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच येथे चांगला विकास व्हावा, यासाठी प्रार्थना करतो. मी मंदिरात जाणे चुकीचे अाहे’’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला अाहे. अाम्ही गुजरातमधील निवडणूक जिंकू, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

मोदी यांच्या सरकारने नोटाबंदी, जीएसटी असे एकामागून एक निर्णय घेत जनतेला धक्के दिले. भाजप सरकारने केवळ उद्योगपतींचे कर्ज माफ केले, अशी टीका त्यांनी केली. कॉंग्रेस सत्तेत अाल्यास चांगल्या अारोग्य सेवा पुरवू, असे अाश्वासन त्यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT