दूध पिशव्यांचे धोरण अधांतरीच !
दूध पिशव्यांचे धोरण अधांतरीच ! 
मुख्य बातम्या

दूध पिशव्यांचे धोरण अधांतरीच !

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘आरे’वगळता दूध पुरवठादारांनी ग्राहकांकडून पिशव्या परत घेण्यास सुरवात केलेली नाही. त्यामुळे सहकारी आणि खासगी दूध संघांनी अजूनही प्लॅस्टिक पिशव्यांच्या फेरवापराबाबत कार्यवाही सुरू केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारच्या या धोरणावरच दूध संघ कृती समितीने आक्षेप नोंदवला आहे. प्लॅस्टिकबंदीतून दुधाच्या पिशव्यांना वगळण्यात आले आहे; मात्र या पिशव्या ग्राहकांकडून परत घेऊन त्याचे रिसायकलिंग करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीवर राहील. सरकारच्या या आदेशाची सुरवात सरकारी दूध वितरक कंपनी ‘आरे’ने केली आहे. ग्राहकाकडून अतिरिक्त ५० पैसे वसूल करण्यात येणार आहेत. ग्राहकाने ही पिशवी परत केल्यानंतर पैसे परत मिळणार आहेत, असा नियम ‘आरे’ने केला आहे. त्यासाठी प्रत्येक पिशवीची नोंद ठेवण्यात येत आहे. इतर दूध पुरवठादारांनी या प्रक्रियेला अद्याप सुरवात केलेली नाही. दुधाचे वितरण पूर्वीसारखेच सुरू आहे. विक्रेत्यांनीही अतिरिक्त ५० पैसे अनामत घेतलेली नाही. ग्राहकाकडून ५० पैसे घेऊन ते नंतर परत करणे व्यावहारिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, असा दावा कृती समितीने केला आहे. दुधाची पिशवी ५० मायक्रॉनपेक्षा जाड आहे. तूर्तास दूध वितरणाची व्यवस्था पूर्वीसारखीच सुरू आहे. ५० पैसे आकारून त्याचा परतावा देणे व्यावहारिकदृष्ट्या योग्य नाही. - विनायक पाटील,  अध्यक्ष, सहकारी व खासगी दूध संघ कृती समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT