टंचाईवर मात करण्यासाठी चारा लागवड
टंचाईवर मात करण्यासाठी चारा लागवड 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात टंचाईवर मात करण्यासाठी चारा लागवड

टीम अॅग्रोवन

नगर : यंदा पावसाने हात आखडता घेतल्याने राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. आगामी काळात जनावरांचे हाल होऊ नये, यासाठी राज्यातील नगरसह १० जिल्ह्यांत महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, अकोला व पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या ७५० हेक्‍टर क्षेत्रावर अतिरिक्त चारा लागवड करण्यात येणार आहे. त्यातून साधारण १० हजार टन हिरवा चारा उपलब्ध होईल.

पावसाने दडी मारल्याने खरीप वाया गेला. रब्बीवरही संकट आहे. राज्यात सुमारे दिडशेच्यावर तालुक्‍यांत टंचाईचे सावट आहे. त्यामुळे यंदा राज्यातील बहूतांश गावांना चारा टंचाई सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, अकोला व पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या पुढाकारातून चारा उत्पादन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी ११ ऑक्‍टोबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे टंचाई स्थितीचा आढावा घेतला. चाऱ्याअभावी पशुधनाचे हाल होऊ नयेत, याची पूर्वतयारी म्हणून खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नगर जिल्ह्याच्या विचार करता यंदा सरासरीच्या ७० टक्के पाऊस झाला आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना सुरू आहेत. त्यासाठी शासनाने चारा उत्पादन करण्यासाठी पायलट प्रोजेक्‍ट हाती घेतला आहे. त्यानुसार कोपरगाव येथील पशुधन विकास महामंडळाच्या १०० एकरांवर चारा लागवड करण्यात येईल. जिल्ह्यातील विविध भागातही चाऱ्याची लागवड केली जाणार आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी सांगितले.

विविध बियाण्यांची लागवड दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर जनावरांचे हाल होऊ नयेत, यासाठी पुरेसा चारा उपलब्ध करण्यात येणार आहे. यात उपलब्ध क्षेत्रांपैकी ५० टक्के क्षेत्रावर ज्वारीच्या मालदांडी, फुले, रुचिरा, पीकेव्ही क्रांती या बियाण्यांची लागवड केली जाणार आहे. २५ टक्के क्षेत्रात मकाचे आणि उर्वरित २५ टक्के क्षेत्रामध्ये न्यूट्रिफीड चारा पिकांची लागवड केली जाणार आहे. चारा हाती आल्यावर त्याचा मुरघास केला जाईल. शिवाय सध्याच्या स्थितीत नैसर्गिकरीत्या त्या प्रक्षेत्रावरील गवत कापून जपून ठेवण्याचेही आदेश दिले आहेत.

असे असेल जिल्हानिहाय क्षेत्र (हेक्‍टर)
महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ
कोपरगाव (नगर) ४०
हिंगोली १००
पोहरा (अमरावती) ५०
जत (सांगली) १००
जुनोनी (सोलापूर) २०
ताथवडे (पुणे) ४०
वडसा (गडचिरोली) १००
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेळी, मेंढी विकास महामंडळ
महुद (सोलापूर) १००
रांजणी (सांगली) १००
पडेगाव (औरंगाबाद) ३०
पोहरा (अमरावती) ३०
अंबेजोगाई (बीड) २०
बोंद्री (नागपूर) १०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT