नापीक जमिनी कार्यक्षमतेसाठी दक्षिण सोलापुरात पथदर्शी प्रकल्प
नापीक जमिनी कार्यक्षमतेसाठी दक्षिण सोलापुरात पथदर्शी प्रकल्प 
मुख्य बातम्या

नापीक जमिनी कार्यक्षमतेसाठी दक्षिण सोलापुरात पथदर्शी प्रकल्प

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः नापीक शेतजमिनींच्या पुनर्वापराची पडताळणी घेण्यासाठी सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी पुढाकार घेतला असून, त्यासाठी त्यांच्या दक्षिण सोलापूर मतदारसंघात एक पथदर्शी कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाची नुकतीच भंडारकवठे (दक्षिण सोलापूर) येथे सुरवात झाली.   राज्यातील प्रत्येक गावात शेतजमिनीचे शेकडो एकर क्षेत्र क्षार, पाणथळ, कुरण यासह विविध कारणांनी वर्षानुवर्षे नापीक व पडीक आहे. या जमिनींचा पीक लागवडीसाठी पुनर्वापर शक्‍य आहे का, याबाबतची चाचपणी घेण्यासाठी एक व्यापक कार्यक्रम सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पुढाकारातून हाती घेण्यात आला आहे. मतदार संघातील प्रत्येक गावात विशेषतः नदीकाठच्या क्षेत्रात अशा क्षारपड व पाणथळचे प्रमाण अधिक आहे. त्या शेतजमिनींचे सर्वेक्षण करणे गरजेचे असल्याने हे काम प्रामुख्याने अशा गावात हाती घेण्यात आले आहे. संबंधित सरकारी यंत्रणांच्या मदतीने अशा पडीक जमिनींचे सर्वेक्षण करून त्या लागवडीखाली आणल्यास तो देशातला एक ‘पॅटर्न’ ठरणार आहे.  या कामाची सुरवात नुकतीच भंडारकवठे येथून करण्यात आली. येथील सुमारे ७०० एकर क्षेत्र क्षार व पाणथळाने बाधित आहे, ते क्षेत्र नापीक घोषित आहे. या क्षेत्राचे सर्वेक्षण करून ते लागवडीखाली आणण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मंत्र्यांनी लघू पाटबंधारे व संशोधन उपविभागास आदेश दिल्याने ही यंत्रणा कामाला लागली आहे. भंडारकवठ्यात या कामाची सुरवात प्रगतशील बागायतदार उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी लघू पाटबंधारे संशोधन उपविभागाचे उपअभियंता राजकुमार शेजाळे, शाखा अभियंता मंजुनाथ तुंबळ, भाजपचे तालुका सरचिटणीस यतीन शहा, विकास सोसायटीचे अध्यक्ष भीमाशंकर बबलेश्‍वर, पंचायत समिती  सदस्य एम. डी. कमळे, सहकारमंत्र्यांचे स्वीय सहायक शेखर येरनाळे, सचिन पाटील, बसवराज घोडके, प्रा. व्ही. के. पाटील, सोमनिंग विरदे, मल्लिनाथ बबलेश्‍वर, सोमनिंग कमळे, ओमकुमार मुक्काणे, संतोष कमळे उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT