पेट्रोल ४९, तर डिझेल ५९ पैशांनी महाग
पेट्रोल ४९, तर डिझेल ५९ पैशांनी महाग 
मुख्य बातम्या

पेट्रोल ४९, तर डिझेल ५९ पैशांनी महाग

वृत्तसेवा

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुरवातीला वधारलेल्या खनिज तेलाचा भाव आठवड्याच्या शेवटी स्थिरावला असला तरी, त्याचा इंधनदरावरील प्रभाव अद्याप कायम आहे. परिणामी तेल वितरक कंपन्यांनी रविवारी सलग चौथ्यांदा पेट्रोल दरात ४९ पैसे तर, डिझेल दरात ५९ पैशांची वाढ केली. नव्या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल व डिझेलची अनुक्रमे ६९.७५ व ६३.६९ रुपये दराने विक्री सुरू आहे. मुंबईत पेट्रोल ४८ पैशांनी महागले असून, त्याचा दर ७५.३९ रुपयांवर गेला आहे. डिझेलदरात झालेल्या ६२ पैशांच्या वाढीमुळे एकलिटर डिझेलसाठी ग्राहकांना ६६.६६ रुपये मोजावे लागत आहेत. आठवडाभरात खनिज तेलदरात १२ टक्के वाढ नोंदविण्यात आली. याबरोबरच डॉलरच्या तुलनेत रुपयात झालेली घसरणही इंधनदरवाढीस कारणीभूत ठरत आहे. दरम्यान, गेल्या सात दिवसांत ८ व ९ जानेवारीचा अपवाद वगळता इंधनदरात पाचव्यांदा झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिक धास्तावले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : धाराशिवमध्ये मोठी चुरस

Liger Pesticide : ‘जीएसपी’चे कीटकनाशक ‘लायगर’ बाजारात

Forest Fire : उत्तराखंडच्या जंगलात आगीचे लोळ; मुख्यमंत्री धामींच्या लष्कराची मदत घेण्याच्या प्रशासनाला सूचना

Crop Varieties Conservation : स्थानिक जातींच्या संवर्धनासाठी आधुनिक बियाणे बॅंक

Agriculture Technology : गाईच्या शेणापासून बनविले ‘गोबायर’

SCROLL FOR NEXT