termeric
termeric  
मुख्य बातम्या

हळद पिकावर करप्याचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन

हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील हळद पिकावर करपा आणि कंदकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना कराव्यात, असा सल्ला तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्रातील विशेषज्ञांनी दिला आहे. हिंगोली जिल्ह्यात यंदा ३४ हजार ७३९ हेक्टरवर हळद लागवड झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतातील आर्द्रता वाढल्यामुळे बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे औंढा नागनाथ, सेनगाव, कळमनुरी, हिंगोली, वसमत तालुक्यातील अनेक गावशिवारांत आढळून आले आहे. हळद पिकाच्या वरच्या भागातील पानावर आढळून येणारे गोल  ठिपके करपा रोगाचे लक्षण आहे. त्यामुळे पाने करपतात. अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. परिणामी हळद कंदाचा आकार लहान राहतो. वजनात घट पर्यायाने उत्पादनात घट येते. कंदकुज रोगामुळे हळद पिकाच्या खालच्या बाजूची पाने पिवळी होऊन करपत आहेत. त्यामुळे उघडले पडलेले कंद मातीने झाकून टाकावेत. शिफारशीत बुरशीनाशांची आळवणी (ड्रेचिंग) करावी. व्यवस्थापनासाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या विशेषज्ञ अनिल ओळंबे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया करप्यामुळे हळदीच्या उत्पादनात घट येते. त्यामुळे वेळीच शिफारशीत बुरशीनाशकांचा वापर करून या रोगाचे व्यवस्थापन करावे. - अनिल ओळंबे, उद्यानविद्या विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर, जि. हिंगोली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT