शेंग खाणारी अळी
शेंग खाणारी अळी 
मुख्य बातम्या

विदर्भात तुरीवर कीड-रोगाचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन

नागपूर ः ढगाळ वातावरणामुळे विदर्भात तुरीवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. कपाशीवरील कीड-रोगामुळे आधीच शेतकरी हवालदिल झाला असताना, त्यांच्यासमोर हे नवे आव्हान उभे राहिले आहे. कपाशीवर या वर्षी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. अनेक प्रयत्न करूनही या किडीचे नियंत्रण शक्‍य झाले नाही. त्यामुळे विदर्भात सर्वदूर कपाशी काढून टाकण्यावर शेतकऱ्यांचा भर राहिला आहे. कपाशीच्या पिकापासून फटका बसला असतानाच आता ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या उत्पादकतेवर परिणाम होण्याची भीती वर्तविली जात आहे. ओखी वादळाच्या परिणामी विदर्भात गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरणाची स्थिती निर्माण झाली आहे. कीड-रोगाला अशा प्रकारचे वातावरण पोषक असल्याने शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, दाणे शेंगमाशी अशा प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव विदर्भात झाला आहे. त्यामध्ये अकोला, अमरावती, वर्धा, बुलडाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यांतील तुरीचा समावेश आहे.

प्रतिक्रिया शेंगमाशीचा प्रादुर्भावदेखील विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये दिसून आला आहे. शेंगा भरलेल्या अवस्थेत याचा प्रादुर्भाव होतो. यामुळे दाणा सडणे किंवा त्याचा आकार कमी होणे अशी अवस्था दिसून येते. त्यासोबतच शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग यांचाही प्रादुर्भाव दिसून आला आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी फवारणीचा निर्णय निरीक्षणाअंती घेणे योग्य आहे. - धनराज उंदीरवाडे, कीटकशास्त्र विभागप्रमुख, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

River Pollution : नदी प्रदूषणमुक्त करणारा ‘महाड पॅटर्न’

Agriculture Electricity : कृषी पंपाच्या वीजपुरवठा अनियमित पिकांना फटका; शेतकरी अडचणीत

Milk Production : वाढत्या उष्णतेचा पशुधनावर थेट परिणाम, मुदतपूर्व प्रसूतीच्या घटनांत वाढ

Climate Change : जो स्वतःला बदलेल, तोच टिकेल

River Pollution : नदी प्रदूषणाबाबत गंभीर कधी होणार?

SCROLL FOR NEXT