jowar
jowar  
मुख्य बातम्या

मराठवाड्यात ज्वारीवर खोडकिडीचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : जिल्ह्यातील काही भागांत सप्टेंबरच्या मध्यानंतर पेरणी झालेल्या ज्वारीच्या पिकावर पाने कुरतडणाऱ्या खोडकिडीच्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. उपाययोजनेनंतर अळीवर नियंत्रण मिळविणे शक्य असले तरी प्रादुर्भावाची स्थिती लक्षात घेता ज्वारीच्या उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात रब्बी ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यांत क्रमाने ज्वारीचे क्षेत्र असते. यंदा लांबलेल्या पावसाळ्याने रब्बी पेरणीत खोडा घातला. त्यामुळे ज्वारी, हरभरा, मका आदी रब्बीत घेतल्या जाणाऱ्या पिकांची पेरणी लांबणीवर पडली. सप्टेंबरच्या मध्यानंतर काही भागांत ज्वारीची पेरणी झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत सप्टेंबर मध्ये ज्वारी पेरणी झालेल्या क्षेत्राचे प्रमाण कमी असले तरी उगवणीनंतर जमीन सोडणाऱ्या पिकावर पाने कुरतडणाऱ्या खोडकिडीच्या अळीचा प्रादुर्भाव झाला.  प्रादुर्भावाचे प्रमाण काही क्षेत्रांत दहा टक्क्यांपेक्षा जास्त, तर काही क्षेत्रात दहा टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे चित्र आहे. रब्बी ज्वारी अशाप्रकारे सुरुवातीच्या काळात यांचा प्रादुर्भाव पहिल्यांदाच अनुभवत असल्याचे शेतकरी सांगतात. जागरूक शेतकऱ्यांनी या अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फवारणीचेही तंत्र अवलंबले आहे.

प्रतिक्रिया दरवर्षी कमी अधिक प्रमाणात रब्बी ज्वारीची पेरणी करतो. यंदा पहिल्यांदाच रब्बी ज्वारीवर पाने कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘केव्हीके’ तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात फवारणी केली. — दीपक जोशी,  शेतकरी, देवगाव. ता. पैठण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT