रेशीम कोष
रेशीम कोष  
मुख्य बातम्या

औरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला अखेर मान्यता

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे नागपूर येथील मुख्यालयातील उपसंचालक (तुती) हे पद औरंगाबाद येथील प्रादेशिक रेशीम कार्यालयात स्थलांतरित करण्याला शासनाने मान्यता दिली आहे. बुधवारी (ता. १८) या संबंधीचा शासन आदेश निर्गमित झाला आहे. वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना येथे झालेल्या रेशीम दिन कार्यक्रमात याविषयीची घोषणा केली होती.  औरंगाबाद विभागातील आठही जिल्ह्यांत रेशीम उद्योगाला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. राज्यात एकूण १९७८३ एकरवर तुतीचे क्षेत्र आहे. त्यापैकी औरंगाबाद विभागातील आठ जिल्ह्यात ११३७३ एकर क्षेत्र आहे. हे क्षेत्र राज्याच्या एकूण क्षेत्राच्या निम्म्याहून अधिक आहे. त्या अनुषंगाने या विभागात रेशीम उद्योगासाठी पायाभूत सुविधा लक्षात घेता औरंगाबाद येथील प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे मजबुतीकरण करून या विभागात उपसंचालक पदावरील प्रादेशिक अधिकारी नियुक्‍त करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ज्या भागात रेशीम उद्योगाखालील क्षेत्र कमी आहे. अशा भागातील रेशीम कर्मचारी हे ज्या भागात क्षेत्र जास्त आहे, त्या क्षेत्रात स्थलांतरित करून प्रशासकीय कामकाज पार पाडणे व्यावहारिक असल्याची बाब शासन निर्णयासाठी विचारात घेण्यात आली.  औरंगाबाद विभागात उपसंचालक स्वतंत्र रेशीम कार्यालय सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावावर संचालक (रेशीम) यांनी ३० ऑगस्ट २०१९ च्या पत्राद्वारे त्यांचा अभिप्राय सादर केला होता. औरंगाबाद विभागात स्वतंत्र रेशीम कार्यालय सुरू करण्यासाठी राजपत्रित, अराजपत्रित मिळून १२ पदे नव्याने निर्माण करण्याचा प्रस्ताव रेशीम संचालनालयाने सादर केला होता. शिवाय वस्त्रोद्योग धोरणांतर्गत राज्यात वस्त्रोद्योग आयुक्तालयांतर्गत रेशीम संचालनालयाचा समावेश करून त्यासाठीचा एकत्रित आकृतिबंध तयार करण्याची बाब स्वतंत्रपणे विचाराधीन असल्याचे शासन आदेशात नमूद आहे. नागपूर येथील रेशीम संचालनालयातील उपसंचालक (तुती) हे पद औरंगाबाद येथील प्रादेशिक रेशीम कार्यालयात स्थलांतरित करण्यास शासनाने मान्यता दिली. शिवाय सहायक संचालक प्रादेशिक रेशीम कार्यालय औरंगाबाद हे पद रेशीम संचालनालय नागपूर येथे स्थलांतरित करण्यात यावे, सोबतच या पदाला यापुढे सहायक संचालक (तुती) असे ओळखण्याचेही शासन आदेशात नमूद आहे.  या शासन निर्णयामुळे  मराठवाड्यात सहायक संचालक (रेशीम) या पदावर उत्तम कामगिरी केलेले दिलीप हाके पुन्हा उपसंचालक (तुती)या पदावर रुजू होण्यास सांगण्यात आले असून, औरंगाबादच्या सहायक संचालकपदी नियुक्‍ती मिळालेले एम. बी. ढवळे यांना नागपूर येथे रुजू होण्याचेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. औरंगाबाद सहायक संचालक कार्यालयात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यापुढे उपसंचालक औरंगाबाद यांच्या अधिनस्त कार्यरत राहतील. तर रेशीम संचालनालयातील रेशीम उपसंचालक (तुती) यांच्या अधिनस्त सर्व कर्मचारी यापुढे सहायक संचालक (तुती) यांच्या अधिनस्त काम पाहतील असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.  प्रतिक्रिया

तातडीने निर्णय घेतला याचा आनंद आहे. यामुळे तुतीचा क्षेत्रविस्तार व शेतकऱ्यांच्या योजना, प्रकल्प जलदगतीने मार्गी लागण्यास मदत होईल.  - विजय अण्णा बोराडे, विश्वस्त मराठवाडा शेती साह्य मंडळ. 

शेतकऱ्यांसाठीच्या योजनांना गती मिळून अंडीपुंज निर्मिती केंद्र, स्टोरेज, शेतकरी प्रशिक्षण केंद्र, रेशीम हब आदी भविष्यातील योजनांविषयीची काम गतीने होतील.  - दीपक बुनगे, रेशीम कोष उत्पादक, रामगव्हाण, जि. जालना.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT