weather
weather 
मुख्य बातम्या

कृषी हवामान बदल संशोधन केंद्रस्थापनेस मंजुरीची गरज

माणिक रासवे

परभणी ः अतिवृष्टी, गारपीट आदी संकटांमुळे (अजैविक ताण) पिकांवर कीड, रोगाचा प्रादुर्भाव (जैविक ताण) आढळून येत आहे. हवामान बदलामुळे शेती व्यवसायापुढे विविध आव्हाने निर्माण झाली आहेत. जिरायतीबहुल क्षेत्र असलेल्या मराठवाड्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत.

याचे संशोधन करून गावपातळीवरील शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर हवामान सल्ला पोचविण्यासाठी सध्याची संशोधन, शिक्षण आणि विस्तार कार्य यंत्रणा अतिशय तोकडी आहे. त्यामुळे मराठवाडा विभागासाठी स्वतंत्र कृषी हवामान संशोधन केंद्राची नितांत गरज लक्षात घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने परभणी येथे कृषी हवामान बदल संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. परंतु मराठवाड्यातील शेतकरी आणि शेती यांच्या हिताचा गांभीर्याने विचार केला जात नसल्यामुळे हा प्रस्ताव अनेक वर्षांपासून शासन दरबारी हा पडून आहे. सध्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात चार लहान कृषी हवामान प्रकल्प आहेत. त्यात हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू कृषी संशोधन संस्थेअंतर्गतच्या अखिल भारतीय कृषी हवामान समन्वित प्रकल्प आणि राष्ट्रीय संवेदनक्षम वातावरण बदल समरसता प्रकल्प यांचा समावेश आहे. या प्रकल्पाअंतर्गत अल्प प्रमाणात कृषी हवामान संशोधनाचे काम चालते. भारतीय हवामान विभागाअंतर्गत दोन लहान कृषी हवामान संबंधित प्रकल्प सुरू आहेत. त्यात ग्रामीण कृषी हवामान सेवा आणि पीक उत्पादनाचा अंदाज वर्तविणे (फसल) यांचा समावेश आहे. ग्रामीण कृषी हवामान सेवा प्रकल्पाअंतर्गत ढोबळमानाने जिल्हा स्तरावर कृषी हवामान सल्ला दिला जातो. परंतु हा सल्ला मंडळ आणि गाव स्तरावर उपयोगाचा ठरत नाही. पीक प्रकल्पाअंतर्गत जिल्हा स्तरावर मुख्य पिकांचा उत्पादन अंदाज काढला जातो. परंतु हा प्रकल्प गेल्या सात-आठ वर्षापासून प्रायोगिक स्थितीत सुरू आहे.  मराठवाड्यातील शेतकरी आणि शेती व्यवसायाला संकटातून बाहेर काढण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामानशास्त्र विभागाच्या परभणी येथील वेधशाळेच्या परिसरात कृषी हवामान बदल संशोधन केंद्र स्थापन करण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने आवश्यक तेवढ्या मनुष्यबळासह या कृषी हवामान संशोधन केंद्रास तत्काळ मंजुरी देण्याची गरज आहे. कृषी हवामान बदल संशोधन केंद्राची उद्दिष्टे

  • मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर (तालुका-मंडळ) हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भू-हवामान वेधशाळा आणि स्वयंचलित हवामान वेधशाळा कार्यान्वित करणे
  • प्रत्येक जिल्ह्यातील हवामान, हवामानातील बदलांचा अभ्यास करणे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत सूक्ष्म वातावरणीय विभागवार अथवा स्थानिक पातळीवर (तालुका-मंडळ) पीक पद्धती विकसित करणे. दुष्काळप्रवण क्षेत्राचे निकष गावपातळीवर तपासणे, त्यांची नव्याने मांडणी करणे, आपत्कालीन पीक नियोजन सुचविणे, हवामान पीक कॅलेंडर तयार करणे.
  • मराठवाड्यातील स्थानिकरीत्या पाण्याचे बाष्पीभवन, बाष्पोत्सर्जन काढणे त्यावर आधारित मुख्य पिकांकरिता पीक वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याची गरज काढणे, शेतकऱ्यांना हवामान बदलानुसार पीक पाणी व्यवस्थापन वेळापत्रक देणे.
  • मराठवाड्यातील प्रत्येक गावात कृषी हवामान सल्ला पत्रिका पोचवणे.
  • बदलत्या हवामानात त्यात दुष्काळ, पावसाचा खंड, अतिवृष्टी, गारपीट, वादळ, धुके, तापमान, उष्णतेची लाट, थंडीची लाट या परिस्थितीत सहनशील पिकांच्या वाणाची चाचणी, शिफारस, नवीन वाणांची निर्मिती, पीक व्यवस्थापन पद्धती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे.
  • कीड व रोग अनुमान प्रारुप काढणे, स्थानिक पातळीवर पीकनिहाय कीड व रोगाचे अनुमान काढणे, मुख्य पिकांचा उत्पादन अंदाज देणे.
  • हवामान आधारित पीक, फळपीक विमा यासाठी उपयुक्त माहिती शासनास उपलब्ध करून देणे.
  • शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योग यांना सूक्ष्म हवामान विभागानुसार मार्गदर्शन करून रोजगार निर्मितीसाठी हातभार लावणे.
  • धुके, गारपीट, पावसाचा खंड, उष्णतेची लाट, थंडीची लाट यांसारख्या नैसर्गिक संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी संशोधन, सयंत्रे उपलब्ध करून देणे.
  • वरील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण, विस्तार कार्य करणे.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

    Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

    Jaljeevan Mission : रायगडमध्ये जलजीवनची निम्‍मी कामे अपूर्ण

    Mango Market : उरणमध्ये आंब्यांची आवक वाढली

    Water Scarcity : पाणीपुरवठा संस्थांचे शेतकरी पाणी टंचाईच्या कात्रीत

    SCROLL FOR NEXT