बीज प्रक्रिया केंद्र सुरू ठेवण्यास मुभा  दूध संकलन, विक्रीच्या वेळेतही बदल Permission to continue seed processing center Milk collection, change in sales time also
बीज प्रक्रिया केंद्र सुरू ठेवण्यास मुभा  दूध संकलन, विक्रीच्या वेळेतही बदल Permission to continue seed processing center Milk collection, change in sales time also 
मुख्य बातम्या

बीज प्रक्रिया केंद्र सुरू ठेवण्यास मुभा  दूध संकलन, विक्रीच्या वेळेतही बदल

टीम अॅग्रोवन

वाशीम : वाढत्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या बाबतच्या सुधारित मार्गदर्शक सूचना २२ एप्रिल रोजी निर्गमित करण्यात आल्या होत्या. सदर मार्गदर्शक सूचनांमध्ये अंशतः बदल करून जिल्ह्यातील महाबीज, शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी विज्ञान मंडळाची बीज प्रक्रिया केंद्र सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच दूध संकलन व विक्री करिता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी या बाबत सुधारित आदेश काढले. शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात बियाण्यांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्ह्यातील महाबीज, शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी विज्ञान मंडळाची बीज प्रक्रिया केंद्रे सुरू ठेवण्यास या आदेशानुसार मुभा देण्यात आली आहे. सदर बीज प्रकिया केंद्रांमध्ये कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना संबंधित कार्यालयांनी ओळखपत्र प्रदान करावे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सदर ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक राहील. 

दूध संकलन-विक्रीच्या वेळेत बदल  जिल्ह्यात दूध संकलन व विक्रीसाठी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. दूध व्यावसायिक दूध वितरणासाठी सकाळी ७ पूर्वी शहरामध्ये येऊ शकतील. तसेच सायंकाळी ७ वाजेनंतर घरी जाऊ शकतील. मात्र, त्यांच्याकडे दुधाचा कॅन सोबत असणे आवश्यक करण्यात आले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chilli Cultivation : धाड परिसरात शेकडो हेक्टरवर यंदा झाली मिरचीची लागवड

Jharkhand Rain Update : झारखंडमध्ये अवकाळीचा कहर; वीज पडून पाच तर झाड कोसळून दोघांचा मृत्यू 

Water Agitation : हंडा घेऊन महिला धडकल्या सिंचन विभागाच्या कार्यालयावर

Loksabha Election 2024 : धाराशिवमध्ये मोठी चुरस

Liger Pesticide : ‘जीएसपी’चे कीटकनाशक ‘लायगर’ बाजारात

SCROLL FOR NEXT