संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

टेंभू योजना सुरू करण्यास लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा

टीम अॅग्रोवन

सांगली : दुष्काळी भागातील महत्त्वाची असणारी टेंभू उपसा सिंचन योजना अद्यापही सुरू होण्याची चिन्हे नाहीत. जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्‍यात पाणीटंचाई दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शेतकरी   टेंभू योजना सुरू करण्याची मागणी करू लागले आहेत. मात्र, टेंभू सिंचन योजनेची पन्नास टक्के वीजबिल थकबाकी भरल्याशिवाय ही योजना सुरू होणार नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. सध्या पाण्याची गरज लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी योजना सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

कवठेमहांकाळ तालुक्‍यातील घाटमाथ्यावर या योजनेचे पाणी यायला अजून सहा महिने लागणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. टंचाईच्या काळात सुरू केलेल्या या योजनेचे वीजबिल शासन भरणार आहे. त्यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून, तो मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. हा प्रस्ताव कधी मंजूर होणार आहे, याबाबत अद्यापही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगणे कठीण आहे. परंतु सध्या पाण्याची गरज लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी योजना सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

टेंभू सिंचन योजनेच्या कार्यक्षेत्रात २३४ गावांतील ८० हजार हेक्‍टर क्षेत्राचा समावेश झाला आहे. आजही टेंभूचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे टेंभू सिंचन योजनेच्या अपूर्ण असलेल्या कामांसाठी निधी आणण्यात व्यस्त आहेत. निधी आल्याने अपूर्ण कामे पूर्ण होण्यास मदत होईल. नव्याने समाविष्ट २२ गावांना सहा महिन्यांनी पाणी मिळणार आहे. पण ज्या भागात पहिल्यापासून टेंभूचे पाणी मिळते आहे, त्या गावांना अगोदर पाणी द्या, अशी मागणी होऊ लागली आहे. मात्र, टेंभू उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सोडण्यासाठी लोकप्रतिनिधी शासनाकडे मागणी करणार का, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

नव्याने समाविष्ट गावांना सहा महिन्यांनी पाणी टेंभू सिंचन योजनेत आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्‍यातील २२ गावे समावेश झाली आहेत. यासाठी २०० कोटी रुपये मिळाले आहेत. त्या गावांना पाणी मिळण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या गावांतील पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT