परभणी पशुवैद्यक महाविद्यालयास टाळे ठोकले
परभणी पशुवैद्यक महाविद्यालयास टाळे ठोकले  
मुख्य बातम्या

परभणी पशुवैद्यक महाविद्यालयास टाळे ठोकले 

टीम अॅग्रोवन

परभणी ः पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्यव्यवसाय विभागाने पशुसंवर्धन विभागातील सहायक पशुधन विकास अधिकारी (गट क) या पदावरून पशुधन विकास अधिकारी (गट ब) पदावर करण्यात आालेल्या पदोन्नतीचे आदेश तसेच पशुधन पर्यवेक्षक हे पदनाम रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी गुरुवारी (ता. १४) सकाळी विद्यार्थ्यांनी परभणी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाला टाळे ठोकले. प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. यामुळे महाविद्यालयाचे कामकाज ठप्प होते.

पशुसंर्वधन विभागातील पशुधन विकास अधिकारी (गट क) या पदावरून पशुधन विकास अधिकारी (गट ब) या पदावर करण्यात आलेल्या पदोन्नतीमुळे भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. पशुधन विकास अधिकारी (गट ब) हे पदनाम पशुधन विकास अधिकारी (गट अ) या पदनामासोबत शेतकख्यांमध्ये संभ्रम पसरवत आहे. पशुधन विकास अधिकारी (गट ब) हे पशुवैद्यक असण्याचा शेतकऱ्यांचा गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे पशुधनावर उपचार करण्यास अपात्र असलेले पशुधन विकास अधिकारी (गट ब) हे श्रेणी १ च्या पशुवैद्यक दवाखान्यामध्ये उपस्थित असतील ते भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या उल्लंघन असेल.

या पदोन्नतीमुळे दूध उत्पादन आणि मांस निर्मितीचे मध्ये घट, झुनेटिक आजारांचा उद्रेक, पशु आरोग्यासोबत मानवी आरोग्य धोक्यात येईल. प्रतिजैविकांचा गैरवापर होईल. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने काढलेला पदोन्नतीचा तसेच पशुधन विकास अधिकारी (गट ब), सहायक पशुधन विकास अधिकारी (गट -क), पशुधन पर्यवेक्षक हे पदनाम रद्द करण्यात यावे.

त्यासाठी ड्रेसर अथवा कंपाउंडर या मागणीसाठी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मंगळवार (ता.१२) पासून विविध आंदोलन सुरू केली आहेत. बुधवारी (ता. १३) पशुवैद्यकीय चिकित्सालयातील तपासणी बंद ठेवली. गुरुवारी (ता. १४) महाविद्यालयास टाळे ठोकून प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उन्हाचा चटका असह्य; राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज कायम

Water Scarcity : भूजल पातळीत घट; ३४ गावांत हातपंप बंद

Agriculture Irrigation : निळवंडेचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको ः आमदार तनपुरे

Crop Loan : जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

Canal Work : गोसेखुर्द कालव्याचे काम रखडले

SCROLL FOR NEXT