Parbhani, Hingoli continues Parbhani, Hingoli continues
Parbhani, Hingoli continues Parbhani, Hingoli continues 
मुख्य बातम्या

परभणी, हिंगोलीत संततधार सुरूच 

टीम अॅग्रोवन

परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडलांत सोमवारी (ता. २७) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली मंडळात अतिवृष्टी झाली. पावसाचा खंड नसल्यामुळे सखल जमिनीतील पिकांमध्ये पाणी साचले आहे. निचरा होत नसल्याने पक्व झालेली उभी पिके जागीच सडून गेली आहेत. सोयाबीनच्या शेंगाना कोंब फुटले आहेत. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण सोयाबीन सडून गेले आहे. हळदीचे कंद, कपाशीची बोंडे सडली आहेत. तुरीच्या पिकांमध्ये मर लागली आहे. नद्या, ओढे, नाल्या काठच्या जमिनीतील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक भागात वादळी वाऱ्यामुळे ऊस आडवे झाले. केळी, संत्रा, मोंसंबी, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. येलदरी, सिद्धेश्वर, निम्न दुधना धरणे, गोदावरी नदीवरील ढालेगाव, तारुगव्हाण, मुद्दगल, डिग्रस येथील उच्च पातळी बंधाऱ्यातून विसर्ग सुरु असल्याने नद्या भरून वाहत आहेत. परभणी जिल्ह्यातील ५२ मंडलांत सरासरी २७.७ मिमी पाऊस झाला. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील अनेक मंडळात जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडलांमध्ये सरासरी २२.२ मिमी पाऊस झाला. हिंगोली मंडलात अतिवृष्टी झाली. हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ तालुक्यांतील मंडलांत जोरदार पाऊस झाला. 

मंडळनिहाय पाऊस (१५ मिमीच्या पुढे) 

परभणी : परभणी : ३०.३, परभणी ग्रामीण २९.३, पेडगाव ३१.३, जांब २६.३, झरी २४.५, सिंगणापूर २९.५, दैठणा ४६.८, पिंगळी २५.८, टाकळी कुंभकर्ण २२, जिंतूर २१, बोरी २५.३, वाघीधानोरा २६.५, दूधगाव २३,सेलू ३४.३, देऊळगाव ४१, वालूर २०.८, कुपटा ४४, चिकलठाणा २४.३, मोरेगाव २८.३, मानवत ३४, केकरजवळा २५.५, कोल्हा ३१.३, ताडबोरगाव ३७.५, रामपुरी २०, पाथरी ४४.३,बाभळगाव ३१.८, हादगाव ४१.३, कासापुरी ५२.८,सोनपेठ १६.५, गंगाखेड ५०.८, महातपुरी २४, माखणी २७, राणीसावगरगाव ३३.५, पिंपळदरी ५२, पालम ४७, चाटोरी १६, बनवस २९, पेठशिवणी २२.८, रावराजूर २१.५, पूर्णा ४१.८, ताडकळस २१, कात्नेश्वर २३.८, चुडावा ३३.८, कावलगाव १९.८. 

हिंगोली : हिंगोली ६६.५, नरसी नामदेव १६.८, सिरसम ६१.८, बासंबा ३३.३, डिग्रस कऱ्हाळे ४३, माळहिवरा ३९.३, खंबाळा १८.३, नांदापूर २१.८, डोंगरकडा १७.५, वसमत १७, आंबा ३४.८, हयातनगर १८.३, हट्टा ४५.५, टेंभुर्णी ३१, कुरुंदा ५०.५, औंढा नागनाथ २५.३, येळेगाव २७.५. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT