पपईचा हंगाम बहरात;  फुलधारणा सुरू  The papaya season is in full swing; Flowering begins
पपईचा हंगाम बहरात;  फुलधारणा सुरू  The papaya season is in full swing; Flowering begins 
मुख्य बातम्या

पपईचा हंगाम बहरात; फुलधारणा सुरू 

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात पपई पिकाची लागवड यंदा किंचित वाढली असून, पीक सध्या जोमात आहे. पावसाने शेतात पाणी साचून नुकसान होऊ नये, यासाठी शेतकरी पिकात प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहेत.  बुरशीनाशके व संप्रेरके ड्रीपमधून पिकाला दिली जात आहेत. खानदेशात नंदुरबारात सुमारे साडेचार हजार हेक्टरवर पपई पीक आहे. एकट्या शहादा तालुक्यात सुमारे ३९०० हेक्टरवर पपई आहे. या पाठोपाठ धुळ्यात सुमारे अडीच हजार हेक्टरवर आणि जळगाव जिल्ह्यात सुमारे तीन हजार हेक्टरवर पपई पीक आहे. जळगावमध्ये चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, पाचोरा भागात पपई आहे. धुळ्यात शिरपूर, शिंदखेडा व धुळे तालुक्यात पपईची लागवड झाली आहे. पीक कमी पावसात जोमात होते. तापी, अनेर नदीकाठच्या काळ्या कसदार जमिनीत अतिपावसानंतर किंवा पाण्याचा निचरा व्यवस्थित न होणाऱ्या क्षेत्रात पिकाचे काहीसे नुकसान झाले. पाणी साचून राहिल्याने दोन ते पाच टक्के झाडे पिवळी, काळी पडून पूर्णपणे खराब झाली आहेत.  या स्थितीत शेतकरी पिकात बुरशीनाशके देण्यासह पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या सऱ्या-चऱ्या व्यवस्थित करून घेत आहेत. पिकाला फुलधारणा सुरू आहे. सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला दर्जेदार फळांची काढणी खानदेशात सुरू होईल. अनेक शेतकऱ्यांनी लागवड गादीवाफा पद्धतीने केली आहे. पॉलिमल्चिंगचा वापरही झाला आहे. या क्षेत्रात तण नियंत्रणाची फारशी आवश्यकता नसल्याची स्थिती आहे. परंतु पिकात लव्हाळा व इतर तण येत असल्याने शेतकरी सध्या नाइलाजाने तणनाशकांचा उपयोग करीत आहेत. पपईचे दर गेल्या हंगामात कमी-अधिक झाले. पण कोविडची समस्या असताना देखील बऱ्यापैकी नफा शेतकऱ्यांना मिळाला. अतिपावसात पिकाची हानी होते, असा गेले दोन वर्षे अनुभव शेतकऱ्यांना आहे. यंदा अति पाऊस येऊ नये, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT