संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पपई दरासाठी समिती स्थापन प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह

टीम अॅग्रोवन

नंदुरबार : पपई दरांबाबत प्रकाशा (ता. शहादा) येथे झालेल्या एका संघटना व शेतकऱ्यांच्या बैठकीत जयनगर व वडाळी (ता. शहादा) येथील दोन शेतकऱ्यांनी संघटनेच्या समिती गठित करण्याच्या प्रक्रियेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. या वेळी किरकोळ शाब्दिक वाद झाला. यातच काही दिवसांपूर्वी पपईचे दर ४.२५ रुपये प्रतिकिलो असे ठरले आहे. याबाबत प्रशासनाने सूचना दिलेल्या असतानाही निर्देशित दरात खरेदी केली जात नसल्याच्या तक्रारी पपई उत्पादकांमध्ये आहेत. 

बैठकीत जे शेतकरी उपस्थित आहेत, त्यांना गृहीत धरून किंवा समोर ठेवून चर्चा करा. जे शेतकरी घरी आहेत, त्यांची समितीत नियुक्ती करू नका किंवा त्यांचा मुद्दा बैठकीत घेवू नका, असा मुद्दा या दोन्ही शेतकऱ्यांनी मांडला. यावरून किरकोळ शाब्दिक वादही झाला. शेतकऱ्यांच्या संघटनेने मात्र पपई उत्पादक असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश या समितीत केला जाईल. शेतकरी कुठेही असोत, ते पपईसंबंधीच्या आंदोलनात असल्याने त्यांना आपण स्थान दिले पाहीजे, असा मुद्दा मांडला. काही वेळेनंतर हा वाद थांबला. 

`पपईचे दर ४.२५ रुपये, अंमलबजावणी करावी` पपईचे दर प्रतिकिलो ४.२५ रुपये असे नुकतेच निश्‍चित झाले आहेत. या दरांची अंमलबजावणी करावी. शेतकऱ्यांनी अपेक्षित दरांसाठी आपला स्वतंत्र दबाव गट तयार केला पाहिजे. पपई दराबाबतचे आंदोलन हे कुणी एका गटाचे, संघटनेचे नसून, त्यात सर्वांचा समावेश करावा, असा मुद्दा पपई उत्पादकांनी मांडला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

Onion Export Policy : अस्थिर कांदा धोरणांचे उमटणार राजकीय पडसाद

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

SCROLL FOR NEXT