पपईचे नवे दर निश्‍चित
पपईचे नवे दर निश्‍चित 
मुख्य बातम्या

पपईचे नवे दर निश्‍चित

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः खानदेशात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पपई दरांचा तिढा दूर झाला असून, पपईला जागेवरच १३.४१ रुपये प्रतिकिलोचा दर द्यावा लागेल. या संदर्भात शहादा (जि. नंदुरबार) येथील बाजार समितीमध्ये व्यापारी, शेतकरी व संचालकांच्या बैठकीत एकमत झाले.  खानदेशात पपईची सर्वाधिक दोन हजार हेक्‍टरपर्यंतची लागवड नंदुरबार जिल्ह्यात केली जाते. यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात लागवड असते. खानदेशात मिळून चार ते साडेचार हजार हेक्‍टरवर पपईची लागवड झाली आहे. नंदुरबारमधील शहादा, तळोदा, नंदुरबार, अक्कलकुवा, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, जामनेर, जळगाव या भागांत पपईची लागवड केली जाते. पपईचे दर खरेदीदारांनी पाडले होते. नोव्हेंबरमध्ये २० रुपये प्रतिकिलोचे दर होते. नंतर १८ रुपये प्रतिकिलोचे दर झाले. यानंतर थेट आठ ते ७ रुपये प्रतिकिलो दरात पपईची खरेदी धुळे, जळगाव व नंदुरबार भागांत केली जात होती. शहादा, तळोदा येथील दरांनुसार धुळे व जळगाव जिल्ह्यातही पपईची खरेदी केली जाते. दर परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. किमान १४ रुपये प्रतिकिलोचा दर मिळावा, कारण यंदा पीक जेमतेम आहे. खर्च अधिक लागला. अतिपावसामुळे सुरुवातीच्या बहाराला फटका बसला, असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते.  खानदेशात ९५ टक्के पपईची शिवार खरेदी केली जाते. शिवार खरेदी दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश व धुळे, जळगाव भागांतील व्यापारी करतात. या व्यापाऱ्यांना दर मान्य नव्हते. यामुळे काही शेतकऱ्यांनी पपईची काढणी बंद केली होती. शेतकऱ्यांची एकजूट लक्षात घेता खरेदीदार नरमले व शहादा येथे बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. ५) बैठक झाली. त्यात पपईला जागेवरच प्रतिकिलो १३.४१ रुपये दर देण्याचे निश्‍चित झाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

Crop Damage : गारपीट, वादळी पाऊस होऊनही पीक नुकसान नसल्याचा अहवाल

Veterinary : पशुचिकित्सा पुनर्रचनेविरोधात पदविकाधारकांनी थोपटले दंड

Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

SCROLL FOR NEXT