पपई
पपई 
मुख्य बातम्या

दराच्या तिढ्यामुळे खानदेशात पपईची काढणी ठप्प

टीम अॅग्रोवन

धुळे ः पपईच्या दराचा तिढा निर्माण झाल्याने धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील पपईची तोडणी किंवा काढणी शेतकऱ्यांनी बंद ठेवली आहे. जोपर्यंत व्यापारी आठ रुपये प्रतिकिलोचा दर देणार नाहीत, तोपर्यंत शेतातून पपईची तोडणी होऊ देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.  धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पपईची तापी काठावरील गावांमध्ये लागवड अधिक आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्‍यात तऱ्हाडी, निमझरी, बलकुवे, अर्थे आदी भागात पपईची लागवड अधिक आहे. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्‍यातील मनरद, नांदरखेडा, प्रकाशा, वडछील, म्हसावद, जयनगर, मोहिदे आदी भागात पपई लागवड आहे. नंदुरबार तालुक्‍यातील समशेरपूर, शिंदे, लहान शहादे, पिंपळोद भागात लागवड आहे. मागील महिनाभरापासून पपई दरांचा तिढा या भागात आहे. व्यापारी शहादा व शिरपूर बाजार समितीला जुमानत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. शेतकऱ्यांना शेतातच किंवा जागेवरच आठ रुपये प्रतिकिलो दर हवा आहे. व्यापारी पाच रुपये ५५ पैसे प्रतिकिलो, असा दर पपईला देत आहेत. व्यापारी जो दर देत आहेत, तो शेतकऱ्यांना मान्य नाही, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT