खानदेशात नव्या हंगामातील पपईची आवक
खानदेशात नव्या हंगामातील पपईची आवक 
मुख्य बातम्या

खानदेशात नव्या हंगामातील पपईची आवक

टीम अॅग्रोवन

जळगाव : नव्या हंगामातील दर्जेदार पपईची आवक सुरू झाली आहे. ती कमी असली तरी सुरवातीच्या दरांचा काहीसा लाभ अर्ली लागवड केलेल्या शेतकऱ्यांना होत असून, दर्जेदार फळांना किमान १५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. सध्या आवक शहादा (जि. नंदुरबार), तळोदा व शिरपूर भागातून सुरू आहे. चोपडा तालुक्‍यातही काही शेतकऱ्यांच्या शेतात पपईचे तोडे झाल्याची माहिती मिळाली.

पपईची काढणी किरकोळ स्वरूपात आहे. नंदुरबार जिल्ह्यात शहादा, नंदुरबार, तळोदा, नागपुरात सुमारे दीड हजार हेक्‍टर, धुळे जिल्ह्यात धुळे, शिरपुरात सुमारे ५०० हेक्‍टर, जळगाव जिल्ह्यात यावल, रावेर, चोपडा, जळगाव, पाचोरा व जामनेर भागात मिळून एक हजार हेक्‍टरवर पपईचे पीक आहे. पावसाच्या भीतीने शेतकरी सुरवातीचे तोडे करून घेत आहेत. नंदुरबार भागात कमी, तर धुळ्यात काही भागात पुरवठा सुरू आहे. दसऱ्यानंतर तो वाढण्याचा अंदाज आहे.

दर्जेदार पपईच्या खरेदीसाठी राजस्थान, मध्य प्रदेशातील खरेदीदार येत आहेत. काही व्यापाऱ्यांनी पपईच्या बागांची पाहणी करून आगाऊ नोंदणी केली आहे. सध्या थेट शेतात १५ रुपये, तर बाजार समितीत कमी दर्जाच्या फळांना १० ते १५ रुपये प्रतिकिलोचा दर आहे. जळगाव बाजार समितीत मागील दोन दिवसांपासून प्रतिदिन सात क्विंटल पपईची आवक झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT