बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशत
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशत 
मुख्य बातम्या

बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशत

टीम अॅग्रोवन

अमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा बिबट दिसल्याने ग्रामस्थ दहशतीत आहेत. त्यामुळे या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा, असा ठराव शेंदूरजना खुर्द ग्रामपंचायतीने घेतला. धामणगाव रेल्वे तालुक्‍यातील गव्हा फरकाडे, शेंदूरजना खुर्द सह परिसरातील अनेक गावांमध्ये बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. आठवडाभरात दोनदा बिबट्या दिसल्याने शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने शेतीकामे प्रभावित झाली आहेत. सध्या शेतात रब्बी पिके असून वीज वितरण कंपनीकडून रात्रीच्यावेळी वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना ओलीत करण्यासाठी रात्री, बेरात्री शेतशिवार गाठावे लागते. बिबट्याच्या दहशतीमुळे हे कामही प्रभावित झाले असून रब्बी पिके धोक्‍यात आली आहेत.  या प्रकाराची गंभीर दखल घेत शेंदूरजना खुर्द ग्रामपंचायतीने तातडीने ग्रामसभेचे आयोजन केले. या सभेत दहशत पसरविणाऱ्या बिबट्याला वनविभागाने तत्काळ जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करावे, असा ठराव घेत तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. वनविभागाने देखील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पावले उचलत परिसरात दोन ट्रॅप कॅमेरे बसविले आहेत. त्यासोबतच वनविभागाने चार वनरक्षकांची नेमणूकही त्या भागात केली आहे. शेतात जातांना चार ते पाचच्या संख्येत जाण्याचा सल्ला वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी दिला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

Agrowon Podcast : कापूस भाव स्थिरावले ; कापूस, सोयाबीन, तूर, तसेच आल्याचा काय आहे दर ?

Animal Treatment : दररोज ३०-४० जनावरांवर उपचार बंधनकारक

Kharif Season : खरिपात वाढणार सोयाबीन, कपाशी क्षेत्र

SCROLL FOR NEXT