‘ॲग्रोवन’ वाचण्याबाबत भाऊसाहेब सतत आग्रही
‘ॲग्रोवन’ वाचण्याबाबत भाऊसाहेब सतत आग्रही 
मुख्य बातम्या

‘ॲग्रोवन’ वाचण्याबाबत भाऊसाहेब सतत आग्रही

Gopal Hage

अकोला : भाऊसाहेब फुंडकर दैनिक अॅग्रोवनचे हे एक नियमित वाचक होते. शेती अाणि शेतकऱ्यांच्या विषयावर अायुष्यभर राजकारण केलेल्या या द्रष्ट्या राजकारण्याला दररोज ‘ॲग्रोवन’ वाचल्याशिवाय चैन पडत नसे. ८ जुलै २०१६ रोजी फुंडकर यांनी कृषिमंत्री पदाची शपथ घेतली अाणि तेव्हापासून ते कृषिविषयक कुठलाही कार्यक्रम असला, अन् त्यात ‘अॅग्रोवन’चा उल्लेख अाला नाही असे कधीच झाले नाही.  शेतकऱ्यांशी, अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते अॅग्रोवनमध्ये आज काय आले, कोणते नवे प्रयोग सुचविण्यात अाले, यशोगाथा याबाबत सांगत. ‘अॅग्रोवन’मध्ये शेती किंवा शेतकऱ्यांचा कोणताही प्रश्न आला तरी त्यावर प्रशासनाला तातडीने काम करण्याचे निर्देश देत असत. सार्वजनिक कार्यक्रमात भाषण करतानाही अनेकदा ते अॅग्रोवनचा आवर्जून उल्लेख करीत. शेती आणि शेतकऱ्यांना समृद्ध करायचे असेल तर ‘अॅग्रोवन’ वाचत चला, इतका ते अाग्रह करीत होते.  कृषी विद्यापीठाचे कुलगुरू असोत, की सर्वसामान्य शेतकरी या सर्वांना त्यांनी वेळोवेळी ‘अॅग्रोवन’चा हवाला ते उदाहरणे सांगितली. विदर्भातील शेतकऱ्याचा सुखी करायचे असेल, तर ‘अॅग्रोवन’मधील प्रयोगांची माहिती, यशकथा आपल्याला प्रत्यक्ष उतरवाव्या लागतील, असे त्यांचे सांगणे असायचे. अॅग्रोवनमध्ये खात्यासंदर्भात वृत्त झळकले की त्याची तातडीने दखल घेत उचित कार्यवाही करा, असा दमही त्यांनी अनेकदा भरला.  गेल्या वर्षी उन्नत शेती-समृद्ध शेतकरी असा नारा देत सर्व योजनांची एकत्रित अंमलबजावणी करण्याची घोषणा त्यांनी केली. याचा शेगावमध्ये राज्यस्तरीय सोहळा झाला. यात त्यांनी अावर्जून ‘ॲग्रोवन’चा संदर्भ देत अधिकाऱ्यांनी-कर्मचाऱ्यांनी वाचन करीत शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान पोचवावे असेही सांगितले होते. कुठल्याही बैठकीत ते शेती अाणि शेतकऱ्यांच्या विषयावर बोलत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT