मुख्य बातम्या

पंचायतराज समिती आजपासून परभणी जिल्हा दौऱ्यावर

टीम अॅग्रोवन

परभणी : महाराष्ट्र विधान मंडळाची पंचायती राज समिती बुधवार (ता. ८) ते शुक्रवार (ता.१०) या कालावधीत परभणी जिल्ह्याच्या दौरा करणार आहे.

विधानसभा सदस्य तथा समिती प्रमुख सुधीर लक्ष्मण पारवे यांच्या नेतृत्वाखालील या समितीमध्ये एकूण २८ सदस्य असून, बुधवारी सकाळी जिल्ह्यातील विधान मंडळ सदस्यांशी अनौपचारिक चर्चा करणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्याशी अनौपचारिक चर्चा करेल.

सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावरील सभागृहात २००८-२००९ आणि २०११-१२ च्या लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालातील जिल्हा परिषदेच्या संबंधातील परिच्छेद संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांची साक्ष घेतील आणि भेट देण्यात यावयाच्या पंचायत समित्या ठरवतील.

गुरुवारी (ता. ९) सकाळी नऊ वाजल्यापासून समिती जिल्ह्यातील पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायतींना भेटी, पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी, संबंधित अधिकाऱ्यांशी प्रश्नावली क्रमांक २ च्या संदर्भात साक्ष घेण्यात येईल. शुक्रवारी (ता.१०) सकाळी दहा वाजल्यापासून जिल्हा परिषदेच्या २०१२-१३ या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष नोंदविण्यात येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT