सोलापूर ः विठुरायाच्या पंढरी समीप आल्याने वारकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला आहे. पालखी मार्गावर फुगडीचा खेळ खेळताना वारकरी.
सोलापूर ः विठुरायाच्या पंढरी समीप आल्याने वारकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला आहे. पालखी मार्गावर फुगडीचा खेळ खेळताना वारकरी. 
मुख्य बातम्या

पालख्या पंढरपूरच्या उंबरठ्यावर...

टीम अॅग्रोवन

भाग गेला, शीण गेला । अवघा झाला आनंद ।।  अशी भावना मनात साठवत ऊन, वारा, पाऊस झेलत गेल्या दोन आठवड्यांपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या विविध संतांच्या पालख्या पंढरपूरच्या उंबरठ्यावर दाखल झाल्या आहेत. या सोहळ्यातील मुख्य अशा संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज पालख्या शनिवारी (ता. २१) वाखरीत मुक्कामी विसावल्या. उद्या रविवारी (ता. २२) त्या पंढरपुरात दाखल होत आहेत.  दरम्यान, आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा उद्या सोमवारी (ता. २३) होत असून, पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. भंडीशेगावातील मुक्काम आटोपून सकाळी संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाला. दुपारी बाजीराव विहिरीजवळ सोहळ्यातील उभे रिंगण पार पडले. त्यानंतर गोल रिंगणही झाले. संत तुकोबाराय, संत सोपानकाका यांच्या पालख्याही याच मार्गावर आल्या. एकाच वेळी सर्व पालख्या पंढरपूर-पुणे महामार्गावर एकत्र आल्याने पंढरपूर ते वेळापूर यादरम्यान भक्तीचा एक वेगळा उत्साह शिगेला  पोचल्याचे दिसले. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघा परिसर उत्साहाने भारून गेला होता. विठुरायाची पंढरी आता अवघ्या काही अंतरावर असल्याने वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह दिसून येत होता. सुमारे पंधरवडाभर चालून थकले असतानाही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील विठ्ठल भेटीचा आनंद लपून राहत नव्हता. जाऊ देवाचियाचा गावा ।  देव देईल विसावा ।।  देवा सांगू सुखदुःख।  देव निवारिल भूक ।। असं बरंचसं काही सुखःदुख देवाला सांगण्यासाठी, त्याच्या दर्शनाने तृप्त होण्यासाठी वारकरी अखंड हरिनामाचा जयघोष करत पंढरीत दाखल होतात. दुसरीकडे पंढरपुरातही संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज, संत निवृत्तिनाथ महाराज यांच्या पालख्या दाखल झाल्याने भक्तीला उधाण आले. या वारीत चंद्रभागेतील स्नानाला विशेष महत्व असल्याने त्यासाठी वारकऱ्यांची गडबड सुरू आहे. आज वाखरीहून सर्व पालख्या पंढरीत प्रवेश करतील.  पंढरीत अडीच लाख वारकरी दाखल आषाढी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर पंढरीतही वारकऱ्यांची गर्दी वाढत असून, शहरातील मंदिरे, मठ, धर्मशाळांमध्ये किर्तन, प्रवचने सुरू आहेत. अनेक ठिकाणी भजनाचे सूर आळवले जात आहेत. शनिवारी दिवसभर वारकऱ्यांची रीघ सुरूच होती. शनिवारी सुमारे अडीच लाख वारकरी पंढरीत दाखल झाले होते. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मिनिटाला २० ते ३० वारकरी दर्शन करून बाहेर पडत आहेत. दर्शनरांगेत सुमारे १५ ते १८ तास दर्शनासाठी लागत आहेत. दर्शनाची रांग शनिवारी गोपाळपूरकडील पत्राशेडच्या पुढे गेली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT