केळी निर्यात
केळी निर्यात  
मुख्य बातम्या

भारतीय केळीवरच पाकिस्तानची मदार

Chandrakant Jadhav

जळगाव ः भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव कायम आहे. दोन्ही देशांचे संबंध एवढे ताणलेले असताना खानदेशातून पाकिस्तानात दर आठवड्याला तब्बल ६०० टन दर्जेदार केळीची पाठवणूक रस्ते मार्गे होत आहे. यामुळे केळी दरांवरील दबाव दूर होण्यास मदत झाली आहे. पुंछ, श्रीनगर (जम्मू - काश्‍मिर) भागातील खरेदीदारांच्या माध्यमातून खानदेशी केळी पाकिस्तानात पोचत आहे. खानदेशातून केळीची निर्यात वाढत असून, दरातही एकाच दिवसात क्विंटलमागे ४५ रुपयांची सुधारणा झाली आहे.  भारताने पाकिस्तानसोबतच्या व्यापारासंबंधी निर्बंध कायम ठेवले आहेत. आठवड्यातून चारच दिवस केळी किंवा इतर माल पाठविण्यासंबंधी काश्‍मिरातील संबंधित यंत्रणेकडून टोकन व्यापारी किंवा केळी पाठवणूक करणाऱ्या मंडळीला मिळत आहे. मागील २० ते २२ दिवसांपासून प्रतिआठवडा सरासरी ४० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची पाठवणूक बॉक्‍समध्ये भरून झाली आहे. सावदा (ता. रावेर) व फैजपूर (ता. यावल) येथील काही एजंट, व्यापाऱ्यांनी पाकिस्तानमधील केळी पाठवणूक करण्यासंबंधी मध्यंतरी नकार दिला होता. याचा परिणाम केळी दरांवर झाला. नंतर श्रीनगर भागातील केळीच्या मोठ्या खरेदीदारांनी मागणी कायम ठेवली. व्यापार कायम ठेवण्यासंबंधी साकडे घातले. मध्यंतरी काही जम्मू - काश्‍मिरातील खरेदीदारांनी रावेर, यावल भागांतील एजंट, व्यापारी यांची भेटही घेतली. नंतर हा केळीचा व्यापार पुन्हा सुरू झाला. 

बॉक्‍समधील पाठवणुकीच्या केळीला जाहीर दरांपेक्षा ५० ते ६० रुपये अधिकचे दर मिळाले. अर्थातच शेतकऱ्यांचा लाभ काहीसा झाला. सरासरी ९५० रुपये प्रतिक्विंटलचे दर थेट जागेवरच पाकिस्तानमधील केळी निर्यातीला शेतकऱ्यांना मिळाले. 

पाकिस्तानलाही खानदेशी केळीशिवाय पर्याय नाही. कारण, तेथे लागणाऱ्या केळीच्या २५ टक्केही उत्पादन होत नाही. इतर देशांमधून केळी आणण्यासाठी समुद्री मार्ग किंवा मालवाहू विमानाचा अवलंब करावा लागेल. ती केळी महाग पडू शकते. भारतातून रस्ते मार्गे केळी येते. दर्जेदार केळी सात दिवसांत पाकिस्तानात पुंछ (काश्‍मिर) च्या सीमेजवळून पाकिस्तानात पोचत आहे. सीमेवर तणाव असला तरी पाकिस्तानमधील केळीची बाजारपेठ न गमावल्याने केळी दरांवर फारसे दबाव वाढलेले नसल्याचा मुद्दाही जाणकार उपस्थित करीत आहेत.

आखातात किमान १६ कंटनेरची पाठवणूक राज्यातून सध्या रावेर (जि. जळगाव), शहादा (जि. नंदुरबार) आणि टेंभूर्णी व कंधर (जि. सोलापूर) येथून आखातात केळीची कंपन्यांच्या माध्यमातून निर्यात सुरू आहे. सोलापुरातील निर्यातक्षम केळी या दोन आठवड्यात कमी होईल. तेथील कंपन्या केळीसाठी खानदेशात येत आहेत. सोलापुरात सध्या सात-आठ कंपन्या केळी निर्यातीसंबंधी काम करीत आहेत. तर जळगाव व नंदुरबारात मिळून आठ कंपन्या काम करीत आहेत. शहादा येथून रोज चार तर रावेरातील तांदलवाडी येथून रोज चार कंटेनर (एक कंटेनर २० मेट्रिक टन क्षमता) केळीची निर्यात आखाती राष्ट्रांमध्ये सुरू आहे. तर सोलापुरातून रोज सात-आठ कंटेनर केळीची पाठवणूक आखातात केली जात आहे. तांदलवाडी येथे कार्यरत कंपन्या निर्यातक्षम व फ्रूटकेअर तंत्रज्ञानाने उत्पादित केलेल्या केळीला प्रतिक्विंटल ११३५ रुपये दर सध्या देत आहेत. बिगर फ्रूटकेअर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या दर्जेदार केळीला किमान एक हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. रावेर व यावलमधून पुढील आठवड्यात रोज असल्याची माहिती मिळाली.  दिल्लीच्या बाजारपेठेत आंध्र प्रदेशची स्पर्धा खानदेशमधील केळीला दिल्लीच्या बाजारात सध्या कमी उठाव आहे. दिल्ली येथील खरेदीदार आंध्र प्रदेशातील एजंटच्या माध्यमातून तुलनेने कमी दरात केळी मागवून घेत आहेत. खानदेशातील दर्जेदार केळीला किमान ९०० रुपये प्रतिक्विंटलचे दर द्यावे लागतात. आंध्र प्रदेशातील ताडपत्री, कुलीवेंद्रा व नारपाडा भागातून ६०० ते ८०० रुपये दरात केळी उपलब्ध होत असल्याने दिल्लीच्या बाजारात आंध्रच्या केळीला उठाव असल्याची माहिती मिळाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT