परिषद उद्धाटन परिषद उद्धाटन
परिषद उद्धाटन परिषद उद्धाटन  
मुख्य बातम्या

औषधी गुणधर्म लक्षात घेता, पेरू, शेवगा शेतीला भविष्यः पांडुरंग वाठारकर

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके आहेत. पण त्यांचे औषधी गुणधर्म लक्षात घेता, भविष्यात या पिकांना मोठी मागणी वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात, चांगले पैसे मिळवून देणारी पर्यायी पिके म्हणून या पिकांचा विचार करता येईल,’’ असे माजी कृषी आयुक्त पांडुरंग वाठारकर यांनी शनिवारी (ता.१४) येथे सांगितले.  अखिल महाराष्ट्र पेरू व शेवगा उत्पादक व संशोधन महासंघाच्या वतीने सोलापुरात शनिवारी पहिल्यांदाच पेरू व शेवग्याची परिषद पार पडली. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. वाठारकर बोलत होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, पेरू व शेवगा महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, राज्य कृषिमूल्य आयोगाचे सदस्य सुहास पाटील, ज्येष्ठ नेत्या पद्मजादेवी मोहिते पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी सर्जेराव तळेकर, आत्माचे उपसंचालक मदन मुकणे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. एल. आर. तांबडे, किरण जाधव, उद्योग भारतीचे महेश कडूस पाटील, माढा पंचायत समितीचे माजी सदस्य पृथ्वीराज सावंत, राजाराम येवले आदी उपस्थित होते. श्री. वाठारकर म्हणाले, ‘‘सोलापूरप्रमाणेच अन्य दुष्काळी भागात पेरू व शेवगा फायदेशीर ठरतील. पेरूचे आणि शेवग्याचे औषधी गुणधर्म चांगले आहेत. पाण्याचा फारसा ताण नाही, कमी कीडरोग यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्याही ते परवडणारे आहे. आज सरकारची धोरणेही बदलत आहेत. वैयक्तिक शेतकऱ्यांनी पुढे येण्यापेक्षा सामूहिक पद्धतीने गटशेती, शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून या पिकांकडे वळले पाहिजे. इस्त्राईलसारख्या देशात ज्या पद्धतीने समूहशेतीद्वारे शेती होते. तशीच शेती आपल्याकडे होण्याची गरज आहे. तरच या पिकांना राजाश्रय मिळेल.’’ शेतकऱ्यांनी ठरवले तर काहीही अशक्‍य नाही, अनेक धडपडी शेतकरी सोलापुरात घडले आहेत. रमेश घोलपसारखा जिल्हाधिकारीही जिल्ह्याच्या ग्रामीण भागातूनच पुढे आला, कामात जिद्द, ध्येय ठेवा, कोणतीही गोष्ट अशक्‍य नाही, असेही ते म्हणाले.  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बिराजदार यांनीही शासनाकडून फळबाग योजनेसाठी पुरेसा निधी दिला जातो आहे. पेरू, शेवग्याकडे वळा, तसेच त्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य द्या, ग्राहक आपल्याकडे आपोआप येईल, असे सांगितले. पद्मजादेवी मोहिते पाटील यांनीही शेतीची बदलती परिस्थिती आणि त्यात पेरू, शेवग्याचे महत्त्व कसे आहे, हे पटवून दिले. कडूस पाटील यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात संघाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी पेरू व शेवगा संघाच्या स्थापनेमागची भूमिका सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती मोहोळकर यांनी केले. तज्ज्ञांचे मार्गदर्शन परिषदेच्या मुख्य उदघाटन समारंभानंतर पेरू व शेवगा उत्पादकांसाठी खास तांत्रिक चर्चासत्रे झाली. त्यात कसबे डिग्रज येथील कृषी संशोधन केंद्राचे डॉ. मनोज माळी यांनी पेरू लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान व मार्केटिंग या विषयावर तर सोलापुरातील कोरडवाहू कृषी संशोधन केंद्रातील डॉ. मंजुनाथ पाटील यांनी शेवगा लागवडीचे सुधारित तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. तसेच कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. एल. आर. तांबडे यांनीही पेरू व शेवगा पिकातील वाण, लागवड व्यवस्थापन, मार्केटिंग या अनुषंगाने मार्गदर्शन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उन्हाचा चटका असह्य; राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज कायम

Water Scarcity : भूजल पातळीत घट; ३४ गावांत हातपंप बंद

Agriculture Irrigation : निळवंडेचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको ः आमदार तनपुरे

Crop Loan : जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

Canal Work : गोसेखुर्द कालव्याचे काम रखडले

SCROLL FOR NEXT