धानाची उघड्यावर साठवणूक
धानाची उघड्यावर साठवणूक 
मुख्य बातम्या

गडचिरोलीत १ लाख ७० हजार क्विंटल धान गोदामाअभावी उघड्यावर

टीम अॅग्रोवन

गडचिरोली  ः गोदामाच्या उपलब्धतेअभावी जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेल्या एकूण धानापैकी १ लाख ७० हजार क्‍विंटल धान खरेदी केंद्र परिसरात उघड्यावर ठेवण्यात आले आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत विविध सहकारी संस्थेच्या माध्यमातून ४ लाख ५८ हजार १७५ क्‍विंटल धानाची खरेदी करण्यात आली.

यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत एकूण ७१ कोटी १ लाख ५१३ रुपये किमतीच्या धानाची खरेदी करण्यात आली. ४ लाख ५८ हजार १७५ क्‍विंटल इतके ते धान आहे. त्यातील अर्धेअधिक धान गोदामाअभावी उघड्यावर ठेवण्याची वेळ आली आहे. खरेदी केलेल्या एकूण धानापैकी १ लाख ९ हजार ३८५ क्‍विंटल धान गोदामात साठविण्यात आले. ६० हजार क्‍विंटल धान भरडाईसाठी राईस मिलमध्ये पाठविण्यात आले. उघड्यावरील ५४ हजार क्‍विंटल धानाची उचल महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे; परंतु तरीही गोदामाच्या उपलब्धतेअभावी १ लाख ७० हजार क्‍विंटल धान उघड्यावर असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

२०१७-१८ च्या खरीप हंगामात गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत ५४ केंद्रांवरून आतापर्यंत ३ लाख ३७ हजार ५३९ क्‍विंटल धानाची खरेदी झाली आहे. या धानाची किंमत ५२ कोटी ३१ लाख ८६ हजार २७१ रुपये आहे. एकूण १८ हजार ४६३ शेतकऱ्यांनी महामंडळाच्या केंद्रावर धानाची विक्री केली. अहेरी उपविभागात यावर्षी ३५ खरेदी केंद्रे मंजूर करण्यात आले. त्याद्वारे १ लाख २० हजार ६३५ क्‍विंटल धानाची खरेदी झाली. खरेदी केलेल्या धानाची किंमत १८ कोटी ६९ लाख ८५ हजार २४२ रुपये आहे.

कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालया अंतर्गत दहा केंद्रावर ७६ हजार १०९ क्‍विंटल धान खरेदी झाली. ११ कोटी ७९ लाख ६९ हजार ३९९  रुपये किमतीचे हे धान आहे. कोरची उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने १४ केंद्रांवरून १५ कोटी ३ लाख ६३ हजार ९०३ रुपये किमतीच्या ९७ हजार ८ क्‍विंटल धानाची खरेदी झाली. आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने १० केंद्रावर ५८ हजार ३५८ क्‍विंटल धानाची खरेदी झाली असून ९ कोटी ४ लाख ५५ हजार ६२८ रुपये त्याची किंमत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT