संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

भंडाऱ्यात ६७ धान खरेदी केंद्रांना मान्यता

टीम अॅग्रोवन

भंडारा  ः धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत जिल्ह्यात ६७ धान खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी खरेदी केंद्रांना मान्यता दिली असली तरी, दिवाळीपूर्वी या केंद्रांवरून हमीभावाने धान खरेदीची शक्‍यता नसल्याने शेतकऱ्यांमधून मात्र नाराजी व्यक्‍त होत आहे. 

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली हे जिल्हे धानाचे कोठार म्हणून ओळखले जातात. हंगामातील हलक्‍या प्रतीचे धान परिपक्‍व होऊन काढणीला आले आहे. काही शेतकरी धानाची काढणी, मळणी करून ते बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. दिवाळीसाठी लागणाऱ्या पैशाची सोय व्हावी, याकरिता शेतकऱ्यांचे हे प्रयत्न होत असतानाच प्रशासनाकडून मात्र शासकीय खरेदीबाबत उदासीनता असल्याची स्थिती आहे.

हमीभाव केंद्रे कधी सुरू होणार याबाबत अनिश्चि‍तता असल्याने बाजारात व्यापाऱ्यांना कमी दराने शेतीमालाची विक्री करावी लागत आहे. ‘अ’ दर्जाच्या धानाला १८३५ रुपये तर साधारण धानाला १८५० रुपये क्‍विंटल असा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. परंतु हमीभावाने खरेदी केंद्रे नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी जिल्ह्यात ६७ शासकीय धान खरेदी केंद्रांना मान्यता दिली आहे. या केंद्रांवरून दिवाळीपूर्वी धान खरेदीची शक्‍यता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

Weekly Weather : मॉन्सूनच्या आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

SCROLL FOR NEXT