Paddy harvest begins with the onset of rains
Paddy harvest begins with the onset of rains 
मुख्य बातम्या

पावसाच्या उघडिपीने भात काढणीला सुरुवात

टीम अॅग्रोवन

पुणे ः परतीचा मॉन्सून देशातून गेल्यानंतर पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भात काढणीस सुरुवात केली. पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यातील भात उत्पादक शेतकरी जवळपास एक ते दीड महिन्यापासून काढणी करतात. दिवाळी सणामुळे अनेक ठिकाणी भात काढणी वेगाने सुरू असल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येते.

पश्चिम पट्ट्यात असलेली मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुके ही भाताची तालुके म्हणून ओळखली जातात. यंदा पश्चिम भागात वेळेवर पाऊस दाखल झाल्यामुळे वेळेवर भात लागवडी झाल्या होत्या. काही भागांत पावसाचा खंड पडल्याने उशिरानेही लागवडी झाल्याचे चित्र होते. या भागातील भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांच्या पश्चिम भागात भाताचे सरासरी ७२ हजार ९५३ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ५७ हजार ९६४ हेक्टर म्हणजेच जवळपास १०३ टक्के भाताची पुनर्लागवडी झाल्या होत्या. यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात इंद्रायणी, फुले समृद्धी अशा वाणाच्या भाताची लागवड केली होती. याशिवाय पार्वती, सोनम, तृप्ती, साईराम या वाणाकडेही शेतकऱ्यांचा कल वाढला होता. परंतु शेतकऱ्यांनी सर्वाधिक इंद्रायणी या वाणाची सर्वाधिक लागवड केली होती.

सुरुवातीच्या काळात काही भागात चांगला पाऊस असल्याने भात पिके जोमात होती. परंतु वाढीच्या अवस्थेत आणि काढणी करण्याच्या अवस्थेत जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली, खेड, जुन्नर आणि आंबेगाव या तालुक्यात भाताचे मोठे नुकसान झाले. त्यातच अनेक ठिकाणी भात पिके वाढीच्या तर काही ठिकाणी पीक निसवण्याच्या अवस्थेत असताना तुरळक ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यातच शेवटच्या टप्प्यात पुरेसा जोरदार पाऊस झाला.

नुकसान झालेल्या भात पिकांचे पंचनामे करण्यात आले आहे. तरीही ज्या ठिकाणी अधिक नुकसान झाले नाही, तेथील भात पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भात पिकांच्या उत्पादकतेत घट येणार असल्याचे चित्र आहे.

तालुकानिहाय भात लागवडी (हेक्टरमध्ये)
तालुका भात लागवड
हवेली २०८४
मुळशी ७६०२
भोर ७५६०
मावळ १२,६७२
वेल्हे ४९७७
जुन्नर १०,८००
खेड ७१७६
आंबेगाव ५४२१
शिरूर
दौंड १५
पुरंदर १४१२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : कांद्याच्या प्रश्नावर ‘जय श्रीराम’चे उत्तर

Sugarcane Harvester : ऊस तोडणी यंत्र योजनेत पूर्वसंमती रद्द होण्याची भीती

Monsoon Update : मॉन्सून अंदमानात दाखल

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा कायम

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

SCROLL FOR NEXT