paddy growers problems about announce the Agitation
paddy growers problems about announce the Agitation 
मुख्य बातम्या

धान उत्पादकांच्या समस्या न सोडविल्यास आंदोलन

टीम अॅग्रोवन

भंडारा ः लाखनी तालुक्‍यात धान खरेदीची प्रक्रिया संथ असल्याने शेतकऱ्यांचे धान केंद्रावर पडून आहे. त्याची तत्काळ खरेदी करावी; अन्यथा तहसील कार्यालयाला घेराव घालण्यात येईल, असा इशारा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी, शेतमजूर संघटनेने दिला आहे. 

भंडारा जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यापासून धान खरेदीला सुरुवात झाली. मात्र, खरेदी केंद्रावर सोयीसुविधांचा अभाव असल्याने अनेक शेतकऱ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर शेतकऱ्यांच्या रांगाचरांगा धान खरेदीसाठी लागल्या होत्या. आपला नंबर लागावा म्हणून चपलांचे टोकन ठेवले जात होते. आक्रोश बघता, पालकमंत्री विश्‍वजित कदम यांनी धान खरेदी केंद्रावर असलेल्या अडचणी दूर करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र, अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांचे धान आजही केंद्रावर पडून आहे. 

लाखनी तालुक्‍यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनादेखील यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. त्यांचे धान खरेदी केंद्रावरच पडून आहे. धान खरेदी पूर्णपणे झालेली नाही ती बुधवारपर्यंत (ता. १८) करण्यात यावी, अशी मागणी लाखनी तहसीलदार मल्लिक विरानी यांच्याकडे करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष मनोज पटले यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. ज्या शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात आले त्यांच्या खात्यावर चुकाऱ्याचे पैसे जमा करण्यात यावेत; तसेच बोनसची रक्‍कम ७०० रुपयेदेखील खात्यावर जमा करावे, या मागण्यांचादेखील समावेश आहे. चुकारे व धान खरेदीबाबत प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला; परंतु त्याची कोणत्याच पातळीवर दखल घेण्यात आली नाही, असाही आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे.

३१ मार्चला धरणे आंदोलन धान खरेदीविषयक मागण्यांची पूर्तता न झाल्यास मंगळवारी (ता. ३१) लाखनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उन्हाचा चटका असह्य; राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज कायम

Water Scarcity : भूजल पातळीत घट; ३४ गावांत हातपंप बंद

Agriculture Irrigation : निळवंडेचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको ः आमदार तनपुरे

Crop Loan : जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

Canal Work : गोसेखुर्द कालव्याचे काम रखडले

SCROLL FOR NEXT