संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यात होणार २३५४ पीककापणी प्रयोग

टीम अॅग्रोवन

पुणे   ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी जिल्ह्यात २३५४ पीककापणी प्रयोग घेण्यात येणार आहे. चालू वर्षी खरीप हंगामात प्रत्येक पिकासाठी हे प्रयोग सुरू झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

खरीप हंगाम २०१९-२० अंतर्गत जिल्ह्यात पीककापणी प्रयोग घेण्यात येत आहेत. हे प्रयोग पीकविमा नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी महत्त्वाचे आहे. खरीप हंगामात मंडळामधील प्रत्येक पिकासाठी किमान बारा प्रयोग घेणे अनिवार्य आहे. जिल्ह्यात एकूण दोन हजार ३५४ पीककापणी प्रयोग घेण्यात येणार आहेत. पीककापणीचे प्रयोग विहित कालमर्यादेत पूर्ण करून त्याची माहिती पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत केंद्र शासनास सादर केली जाणार आहे. 

पीककापणी प्रयोग महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभाग अशा तिन्ही यंत्रणांमार्फत करण्यात येतात. पीक उत्पादनाची आकडेवारी कृषी विभागाला अचूक व वेळेवर उपलब्ध होण्यासाठी पीककापणी प्रयोगाचे नियोजन, अंमलबजावणी आणि पर्यवेक्षणासाठी प्रत्येक तालुक्यात समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका विकास अधिकारी, ग्रामीण बॅंकेचे तालुक्यातील प्रतिनिधी, विमा प्रतिनिधी यांचा समावेश आहे.तसेच ग्रामस्तरावरदेखील यासाठी समिती स्थापन करण्यात येते. त्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच, विमा प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधीयांचा समावेश केला जातो. पीककापणीच्यावेळी ग्रामस्तरीय समितीतील सदस्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. 

मंडळ गटात प्रत्येक पिकासाठी किमान बारा प्रयोग, तालुका, तालुका गटस्तरावर सोळा प्रयोग घेणे अनिवार्य आहे. जिल्ह्यात होणाऱ्या २३५४ प्रयोगांपैकी महसूल विभागाने ४७०, जिल्हा परिषदेने ६७८ आणि कृषी विभागाने एक हजार २०६ प्रयोग घेणे बंधनकारक आहे. पीककापणी प्रयोगासाठी  जिल्ह्यात मुख्य पिकाची एकूण एक लाख ७५ हजार ३७८ हेक्टरवर पेरणी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच ३२ हजार ६८७ शेतकऱ्यांनी २२ हजार ८४१ हेक्टर क्षेत्राचा पीकविमा काढला आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत शिरूर तालुक्यात मूग व सुरवातीस पेरणी झालेल्या बाजरी पिकांची कापणी सुरू झाली आहे.       तालुकानिहाय पीककापणी प्रयोगाची संख्या   : हवेली १६८, मुळशी ११६, भोर २१६, मावळ १३८, वेल्हे ११४, जुन्नर १३२, खेड ३००, आंबेगाव १७६, शिरूर २८८, बारामती १९०, इंदापूर १८२, दौंड १५५, पुरंदर १७९.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT