Order to conduct damages in Nanded
Order to conduct damages in Nanded 
मुख्य बातम्या

नांदेडमध्ये नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

टीम अॅग्रोवन

नांदेड : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे खरीप पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी पंचनामे करून संबंधित तहसील कार्यालयाला कळवावे’’, असे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाचा जोर वाढला. या वेळी पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे अनेक मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. सततच्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येऊन नदीकाठच्या पिकांना बाधा पोचली. या सोबतच सखल भागातील शेतातही पाणी साचून पिकांचे नुकसान झाले. यात काही नागरिकांना जीवही गमवावा लागला.

अतिवृष्टीमुळे शेतीपिकासह फळपिकांच्या नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील सर्व १६ तहसीलदारांना नुकसानीबाबत पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले.  शेतीपिकांचे नुकसान ३३ टक्क्यांच्यावर तसेच त्यापेक्षा कमी असल्यास कळवावेत. ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यकांनी तत्काळ संयुक्त पंचनामे करून संबंधित तहसील कार्यालयाला कळवावे. पंचनामे केलेले फोटो तसेच इतर पुरावा गावनिहाय जतन करण्याचे आदेश देण्यात आले.

सरसकट पंचनाम्याची मागणी

जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे शेतीपिकांसह भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुरामुळे नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. नुकसानीचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे वैयक्तिक पंचनामे न करता सरसकट नुकसान दाखवून अडचणीतील शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT