Order of the Banana Punchnama in Akot
Order of the Banana Punchnama in Akot 
मुख्य बातम्या

अकोटमधील केळीच्या पंचनाम्याचे आदेश

टीम अॅग्रोवन

अकोलाः जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात गारपिटीमुळे विमाधारक केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. त्याचे तातडीने संयुक्त पंचनामा करा, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तालुका पातळीवर यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अकोट तालुक्यातील पणज महसूल मंडळात १६ ते १८ फेब्रुवारी २०२१ या काळात गारपिटीमुळे केळी पिकांचे नुकसान झाले होते. सोमवारी (ता.२२) सन २०१९-२० मधील केळी पीकविम्याच्या मुद्यावरुन अकोल्यात मोठे आंदोलन झाले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या वर्षातील गारपिटीचा मुद्दा चर्चेत आला होता. यावेळी प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कांतप्पा खोतही उपस्थित होते. 

जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने अहवाल बनविण्याचे आदेश दिले. त्यानुसार १३ फेब्रुवारी ते २३ मार्च या काळात पणज, बोचरा महसूल मंडळ, अकोली जहाँगीर परिसरातील विमा धारक शेतकऱ्यांनी नुकसानाची सूचना ७२ तासांत विमा कंपनीकडे दिली. अशा शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे नुकसानीचे संयुक्त पंचनामे होतील. तलाठी प्रवीण गिल्ले (पणज), कृषी सहायक एम. के. काळे, गायत्री घुगे (बोचरा), एम. के. काळे, एन. एस. रतन (वडाळी देशमुख), एस. एस. तळोकार, राजेंद्र चरावंडे (चंडिकापूर), एस. एस. तळोकार, के. एस. सोलकर (महागाव), आर. जी. राऊत, एम. के. वाळके (रईखेड), आर. जी. राऊत, पी. ए. होपळ (अकोली जहाँगीर), आर. जी. राऊत यांची पंचनाम्यांसाठी नियुक्ती केली आहे. 

सर्वेक्षण तत्काळ सुरू करा

सर्वेक्षणाचे काम तत्काळ सुरू करावे, तलाठ्यांनी पिकपेरा क्षेत्र निश्‍चित करून द्यावे, कृषी सहायकांनी पिकांचे नुकसान आहे किंवा नाही व असल्यास त्याची टक्केवारी, ग्रामसेवकांनी नुकसानीचे पंचनामे ग्रामपंचायतीत प्रसिद्घ करून त्याचा अहवाल द्यावा. विमा कंपनीच्या प्रतिनिधीने सर्व पंचनामे गोळा करून त्याचा गोषवारा व अहवाल तालुका कृषी अधिकाऱ्याकडे द्यावे, असे अकोट तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांनी संयुक्त आदेशात नमूद आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT