संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

विधीमंडळ अधिवेशन ः सलग तिसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक

टीम अॅग्रोवन

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही बुधवारी (ता.१९) विधान भवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

राज्याचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर करण्यात आला; परंतु अर्थसंकल्प सादर होतानाच तो अर्थमंत्र्यांच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असल्याचा मुद्दा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी समोर आणला. त्यामुळे या मुद्यावर विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सकाळी अधिवेशन सुरू होण्याआधी विधान भवनाच्या पायऱ्यांवर अर्थसंकल्प फुटल्याचा जोरदार निषेध करण्यात आला. याशिवाय राज्यातील गंभीर दुष्काळ आणि सरकार करत असलेले दुर्लक्ष, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, यासह इतर मुद्यांवरही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आंदोलन केले. 

या वेळी विरोधी पक्षांचे सदस्य विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांचे आगमन झाले. त्या वेळी ''नाथाभाऊंना डावलणाऱ्या सरकारचा धिक्कार असो'' अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. त्या वेळी पुढे येऊन एकनाथ खडसे यांनी अजित पवार यांच्याबरोबर हस्तांदोलन केले. विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतरही विरोधकांची सरकारविरोधात घोषणाबाजी सुरूच होती. ‘फुटलेल्या अर्थसंकल्पाची चौकशी झालीच पाहिजे’, ‘भाजपा-सेना सरकार हाय हाय’, ‘गरीब शेतकरी, धनगर, मुस्लिमांना फसवण्याऱ्या सरकारचा धिक्कार असो’, प्रसिद्धीसाठी हपापलेल्या फडणवीस-मुनगंटीवार सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा देण्यात आल्या. कोणाच्या फायद्यासाठी अर्थसंकल्प लिक केला असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी उपस्थित केला. दरम्यान, ट्विटचे पुरावे दिले तर चौकशी करतो, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT