सोलापुरात खरिपासाठी अवघे १५५ कोटींचे कर्जवाटप
सोलापुरात खरिपासाठी अवघे १५५ कोटींचे कर्जवाटप 
मुख्य बातम्या

सोलापुरात खरिपासाठी अवघे १५५ कोटींचे कर्जवाटप

टीम अॅग्रोवन

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी कर्जवाटपाचे उद्दिष्ट १३८४ कोटी रुपये असताना, आतापर्यंत केवळ १५५ कोटींचे वाटप झाले आहे. बॅंकांच्या या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पुरेसे कर्जवाटप करा आणि गतवर्षीच्या तुलनेत यंदा कर्जवाटपाचा टक्‍का सुधारा, अशा शब्दांत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी (ता. १५) बॅंकेच्या अधिकाऱ्यांना सुनावले. खरीप हंगाम कर्जवाटपाच्या आढावा बैठकीत डॉ. भोसले यांनी ही भूमिका घेतली. सोलापूर जिल्हा हा रब्बीचा जिल्हा आहे; परंतु मागील काही वर्षांपासून खरीप पिकांची लागवड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. खरीप हंगामासाठी बॅंकांना जिल्हा अग्रणी बॅंकेकडून कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दर आठवड्याला कर्जवाटपाचा आढावा घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार मंगळवारी (ता. १५) जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सर्व बॅंकांची बैठक घेतली. परंतु, बॅंक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बॅंकेसह अन्य तीन बॅंकांचे प्रतिनिधी गैरहजर राहिले. त्यांच्याकडून आता खुलासा मागविला आहे. त्यातच जिल्ह्यातील जिल्हा बॅंकेसह राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून एकूण कर्जाच्या केवळ १५५ कोटी रुपयांचे वाटप केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तेव्हा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी बॅंकांना चांगलेच सुनावले. कोणत्याही परिस्थितीत कारणांचा पाढा न वाचता काम करा, अडचणी असतील तर सांगा, पण दिलेले उद्दिष्ट पूर्ण केलेच पाहिजे, असे सांगितले. तसेच खरीप हंगामात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत शेतकऱ्यांना पुरेसा कर्जपुरवठा करावा, जेणेकरून त्यांना खासगी सावकाराकडे जाण्याची वेळ येऊ नये, याची बॅंकांनी खरबरदारी घ्यावी. तसेच कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनाही बॅंकांकडून कर्जपुरवठा व्हावा.  २३ हजार शेतकऱ्यांना कर्जवाटप यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला एकूण १३८४.०८ कोटी इतके उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्यात जवळपास १ लाख ५० हजार ५५० शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे; पण बॅंकांच्या उदासीनतेमुळे हंगाम तोंडावर आला, तरी आत्तापर्यंत केवळ २३ हजार ७४६ शेतकऱ्यांना १५५ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. एकूण कर्जवाटप आणि शेतकऱ्यांची संख्या पाहता, अतिशय धीम्या गतीनेच ही प्रक्रिया चालल्याचे दिसून येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT