तूर विक्रीबाबत ८०० शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी
तूर विक्रीबाबत ८०० शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी  
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यात तूर विक्रीबाबत ८०० शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीने ज्वारीसह अनेक पिकांचे नुकसान झाले. मात्र, तुरीचे उत्पादन बऱ्यापैकी आहे. शासकीय तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. आत्तापर्यंत सुमारे ८०० शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. दरम्यान, ऑनलाइन नोंदणीसाठी १५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.  जिल्ह्यात जळगाव, चोपडा, अमळनेर, रावेर, मुक्ताईनगर, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, जामनेर, भुसावळ येथे तूर खरेदी केली जाईल. तुरीला ५८०० रुपये प्रतिक्विंटल असा दर शासकीय खरेदी केंद्रात दिला जाणार आहे. बाजारात यापेक्षा दर कमी असल्याने अनेक शेतकरी खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. जसे ज्वारी व मका खरेदीबाबत दिरंगाई, अनास्था असे प्रकार घडले, तसे तुरीबाबत करू नका, लवकर खरेदी सुरू करा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.  जिल्ह्यात यंदा १४० टक्के पाऊस झाला. ऐन दिवाळीत झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कापसासह ज्वारी, मका इतर पिकांचे नुकसान झाले. ज्वारीला कणसे लागून काढणीवर आली होती. अनेकांनी ज्वारी, मका काढून ठेवला. मात्र, अतिवृष्टीने शेतातील ज्वारी काळी पडली. काढून ठेवलेल्या ज्वारी, मक्‍यात ओल निर्माण होऊन बुरशी आली. त्यानंतर शासकीय धान्य खरेदी सुरू झाली. मात्र, त्यावर चांगल्या दर्जाचा माल घेतला जाईल, असे स्पष्ट केले गेले. काळ्या धान्याबाबत ना अधिकारी बोलले ना लोकप्रतिनिधी. यामुळे काळी ज्वारी शेतकऱ्यांकडे तशीच पडून राहिली. केंद्रे सुरू झाल्यानंतर काळी ज्वारी केंद्रावर नाकारली जाईल. यामुळे शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलीच नाही. ज्यांची चांगली ज्वारी होती, अशा केवळ ४०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. मक्‍याची १४० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT