Onion should also be purchased with onion nafed
Onion should also be purchased with onion nafed 
मुख्य बातम्या

अकोल्यातही कांदा नाफेडने खरेदी करावा : शेतकरी संघटना

टीम अॅग्रोवन

अकोला ः केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून नाशिक भागात कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या खरेदीचे एक केंद्र अकोला जिल्ह्यातही दिले जावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने शासनाकडे केली आहे, अशी माहिती संघटनेच्या सोशल मीडियाचे राज्य प्रमुख विलास ताथोड यांनी दिली आहे. 

सद्यःस्थितीत कांदा उत्पादक सर्वत्र अडचणीत आहे. केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून नाशिक भागात कांदा खरेदीचा निर्णय घेतला. अकोला जिल्ह्यात पाच हजार एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर कांद्याची लागवड होत असते. सध्या हजारो टन कांदा उत्पादीत झालेला असून त्याला खरेदीदार नाही. 

साठवणुकीची सुविधा नसल्याने शेतकऱ्यांनी उपलब्ध साधनांच्या आधारे कांदा झाकलेला आहे. मात्र, हे फार दिवस टिकू शकणार नाही. अशा परिस्थितीत नाशिक भागात ज्या प्रमाणे कांदा खरेदी केला जाणार आहे. याच धर्तीवर अकोल्यासह जेथे-जेथे कांदा उत्पादन केले जाते त्या ठिकाणी नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करून शासनाने संकटातील शेतकऱ्यांना बाहेर काढावे, अशी मागणी करण्यात आली आहे. 

कांद्याला कमी दराने मागणी  यंदाच्या हंगामात उत्पादीत केलेला कांदा लॉकडाऊनमध्ये व्यापारी घ्यायला तयार नाहीत. जे खरेदी करण्यास तयार आहेत, ते अत्यंत कमी दरात ६०० रुपयांपर्यंत मागणी करीत आहेत. वास्तविक बाजारात कांदा २० ते ३० रुपये किलोने व्यापारी सर्रास विक्री करीत आहेत. अशी विपरित परिस्थिती उद्भवल्याने कांदा उत्पादकांची गोची झालेली आहे. यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करीत हमीदराने नाफेडच्या माध्यमातून खरेदी केल्यास शेतकऱ्याला दिलासा मिळेल. 

साठवणुकीची सुविधा त्रोटक  या भागात कांदा पिकवला जात असला तरी साठवणुकीची साधने नसल्यासारखी आहेत. कांदा चाळीचे जाळे अगदी बोटावर मोजण्याएवढे आहे. आता या भागात उष्ण तापमानाचा कालावधी सुरू झाला. दररोज ४२ अंशापेक्षा अधिक तापमान राहत आहे. मे महिन्यात हा पारा ४५ अंशापर्यंत पोचत असतो. अशा स्थितीत कांदा टिकवून ठेवणे सामान्य शेतकऱ्यांना शक्य नाही. परिणामी शासनाने नाशिकप्रमाणेच याही भागात खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी कांदा उत्पादकांमधून पुढे आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT