सिन्नर बाजार समितीत कांदा आवकेत चढउतार
सिन्नर बाजार समितीत कांदा आवकेत चढउतार  
मुख्य बातम्या

सिन्नर बाजार समितीत कांदा आवकेत चढउतार

टीम अॅग्रोवन

नाशिक (प्रतिनिधी) : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीसह नांदूरशिंगोटे आणि पांढुर्ली उपबाजारात कांद्याची आवक निम्म्याने घटली आहे. नांदूरशिंगोटे उपबाजारात गेल्या आठवड्यापर्यंत कांद्याची आवक ६ ते ७ हजार क्विंटल होती. ती आता ३ हजार क्विंटलपर्यंत आली आहे. आवक निम्म्यावर घसरली आहे. असे असले तरी दरात सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचेच रोजच्या लिलावावरून दिसून येत आहे. नांदूरशिंगोटे आणि पांढुर्ली उपबाजारात कांदा गोणीच्या स्वरूपात लिलाव होतात. पांढुर्लीतही गोणी कांद्याची आवक निम्म्यावर आली आहे. सिन्नर, दोडी आणि नायगाव उपबाजारातही असेच दर असल्याने आवक मंदावल्याचे चित्र आहे. मे महिन्याच्या सुरवातीला कांद्याचे बाजारभाव १०० ते १००१ रुपये प्रतिक्विंटल होते तर सरासरी भाव ८०० रुपये होते. सोमवारी (ता. १३) कांद्याचे भाव १०० ते ११२५ रुपये होते तर सरासरी भाव ८२५ रुपये होते. चालू वर्षी मे महिन्यात कांद्याचे दर वाढतील अशी अपेक्षा होती. मात्र, उन्हाळ कांद्याच्या भावात समाधानकारक वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा साठवण्यावर भर दिला आहे. परिणामी, सिन्नर बाजार आवारात कांद्याची भावात चढउतार असल्याने आवकेतही चढउतार होत असल्याचे दिसून आले. मागील वर्षांपासून कांद्याला समाधानकारक दर मिळालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी उत्पादन घेऊनही तोट्यात आहेत. त्यामुळे कांदा लागवड व काढणीपर्यंत केलेला खर्चही वसूल झालेला नाही. अनेक शेतकऱ्यांना बाजारात आणण्यासाठी स्वमालकीचे वाहन नसल्याने कांदा वाहतूक करणे परवडत नाही. त्यामुळे हा अतिरिक्त खर्च उत्पादकाला करावा लागत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे. असे असले तरी मागील वर्षाच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी यंदा कांदा साठवणुकीस पसंती दिली जात आहे. आधुनिक कांदा चाळी उभारून शेतकऱ्यांनी त्यात कांदा साठविला आहे. मात्र, वाढत्या उष्णतेमुळे कांदा साठवून ठेवल्यानंतर तो टिकविण्यासाठी बारकाईने लक्ष द्यावे लागणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT