Onion auction will be held on Thursday at Solapur Market Committee 
मुख्य बातम्या

सोलापूर बाजार समितीत गुरुवारीच होणार कांद्याचे लिलाव

टीम अॅग्रोवन

सोलापूर : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सोलापूर बाजार समितीच्या आवारातील गर्दी अद्यापही कमी होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळेच सध्या कांदा लिलाव बंद होते. पण, बाजार समितीमध्ये आता कांद्याचे लिलाव आठवड्यातून एकदाच दर गुरुवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

सोलापूर बाजार समितीत होणारी गर्दी कमी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बाजार समिती प्रशासनाला केल्या होत्या. लिलावावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी कांद्याचे लिलाव बाजार समितीच्या आवारात न करता ते बाहेर मोकळ्या जागेत करावे, अशा सूचनाही केल्या होत्या. 

समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळे, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील, बाजार समितीचे सचिव उमेश दळवी यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक झाली. बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारातून मालवाहतूक वाहने सोडावी, बोरामणी नाक्‍याकडील प्रवेशद्वारामधून मोटारसायकली आणि माणसांना सोडावे, समितीतील वाहनांची गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार बाजार समितीने बाजार समिती आवारात येणाऱ्या वाहनांचे आणि वाहतुकीचे, पार्किंगचे नियोजन आखले आहे. 

निराधार, कामगारांसाठी मदत

सोलापूर शहर व जिल्ह्यात असलेल्या निराधार आणि परराज्यातील कामगारांना मदतीचा हात देण्यासाठी समितीतर्फे जीवनावश्‍यक वस्तूंच्या दोन हजार किट दिल्या जातील. त्यात तांदूळ, डाळ, तेल, साबण, हळद, मीठ, साबणाचा समावेश असेल. या दोन किट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्त केल्या जातील.  कोरोना लढ्यासाठी २२ लाखांची मदत 

कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर बाजार समितीने त्यासाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीला व मुख्यमंत्री सहाय्यता निधीला प्रत्येकी ११ लाख रुपये अशी एकूण २२ लाख रुपयांची मदत केली जाणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT