one and half thousand cusecs release from the left canal of Jaikwadi
one and half thousand cusecs release from the left canal of Jaikwadi 
मुख्य बातम्या

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून दीड हजार क्‍युसेकने विसर्ग

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पावरून डाव्या कालव्याने रब्बी सिंचनासाठी दीड हजार क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद, जालना व परभणी जिल्ह्यांत सिंचन करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आठवडाभरापासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पावरून कालव्याद्वारे केल्या जाणाऱ्या सिंचनासाठी बुधवारी (ता. ११) सायंकाळी डाव्या कालव्यातू पाणी सोडण्यात आले. रब्बीसाठी निर्धारित तीन आवर्तनाच्या पहिल्या पाळीला सुरुवात झाली. सुरुवातीला ३०० क्‍युसेकच्या गतीने पाणी सोडून टेलपर्यंत पाणी पोचण्यात कोणता अडथळा तर नाही ना, याची चाचपणी करण्यात आली. १५ डिसेंबरपासून नियमित पाणी पाळीला सुरुवात करण्यात आली.  

जायकवाडी प्रकल्पातून रब्बीसाठी तीन पाणी आवर्तनाचे नियोजन जलसंपदा विभागाच्या जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. १५ डिसेंबर २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२० दरम्यान ही आवर्तने सोडली जातील. औरंगाबाद, जालना, परभणी जिल्ह्यांत २०८ किलोमीटरच्या डाव्या कालव्याद्वारे ३०० क्‍युसेकने सुरू केलेले पाणी टप्प्याटप्प्याने आता दीड हजार क्‍युसेकवर नेण्यात आले आहे.

टेलपर्यंत पाणी पोचण्यात कोणताही अडथळा न आल्याने हा विसर्ग वाढवत नेल्याचे सूत्रांनी सांगितले. पैठण व परभणी या दोन विभागाच्या अखत्यारीत हा कालवा येतो. पैठण उपविभागांतर्गत पहिल्या १२२ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यात जवळपास ४६ चाऱ्यांच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी घेतले जाते. डाव्या कालव्याचा दुसरा टप्पा जवळपास ८६ किलोमीटरचा आहे. तो परभरणी उपविभागांतर्गत येतो. 

उजव्या कालव्यातून मागणीनुसार पाणी

१३२ किलोमीटर अंतराच्या उजव्या कालव्यातून अजून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला नाही. या कालव्यातून सिंचनासाठी मागणीनुसार पाणी सोडले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT