दीड एकरातील डाळिंबावर फिरवला नांगर One and a half acres Plow turned on pomegranate
दीड एकरातील डाळिंबावर फिरवला नांगर One and a half acres Plow turned on pomegranate 
मुख्य बातम्या

दीड एकरातील डाळिंबावर फिरवला नांगर 

टीम अॅग्रोवन

रिसोड, जि. वाशीम : अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने व कर्जबाजारीपणा वाढत असल्याने तालुक्यातील हराळ येथील शेतकरी भीमराव विक्रम बिल्लारी यांनी दीड एकरांतील डाळिंब बाग जेसीबीने उखडून टाकली.  

भीमराव बिल्लारी यांच्याकडे दीड एकर शेती आहे. फळबाग लागवडीतून चांगले उत्पन्न मिळेल, या आशेवर त्यांनी सहा वर्षांपूर्वी डाळिंबाची लागवड केली होती. सुरुवातीला दोन वर्षे बऱ्यापैकी उत्पादन झाले. परंतु मागील काही वर्षांपासून उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यातच कर्जाचा डोंगर वाढला. दीड एकरांवर फळबाग असल्यामुळे इतर पिके घेता येत नव्हती व बागेपासूनही काहीच उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे चार वर्षांतच कर्ज वाढत गेले.

शासनाच्या कृषी विभागाकडून फळबाग लागवडीकरीता दिले जाणारे अनुदानही मिळाले नाही. डाळिंब लागवडीपासून तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च झाला. त्यामुळे बिल्लारी यांच्या आर्थिक अडचणीत वाढ होत गेली. शेवटी त्यांनी डाळिंबाची झाडे काढून टाकण्याचा निर्णय घेतला. दीड एकरांतील झाडे जेसीबीच्या साह्याने उपटून टाकली.

प्रतिक्रिया माझ्याकडे दीड एकर शेती आहे. फळबाग लागवडीतून चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा होती. परंतु उत्पन्न झाले नाही. तसेच कृषी खात्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही शासनाचे अनुदानही मिळाले नाही. कर्ज वाढल्याने शेवटी ही बाग काढावी लागली. -भीमराव विक्रम बिल्लारी, शेतकरी हराळ ता. रिसोड, जि. वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

Jaljeevan Mission : रायगडमध्ये जलजीवनची निम्‍मी कामे अपूर्ण

Mango Market : उरणमध्ये आंब्यांची आवक वाढली

Water Scarcity : पाणीपुरवठा संस्थांचे शेतकरी पाणी टंचाईच्या कात्रीत

SCROLL FOR NEXT