नऊ मतदान केंद्रांवर होडीने जाणार अधिकारी
नऊ मतदान केंद्रांवर होडीने जाणार अधिकारी 
मुख्य बातम्या

नऊ मतदान केंद्रांवर होडीने जाणार अधिकारी

टीम अॅग्रोवन

वाण्याविहीर, जि. नंदुरबार  : अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघातील नर्मदा काठावरील नऊ मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना बार्जने (स्वयंचलित होडी) जावे लागणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा -अक्राणी या विधानसभा मतदारसंघातील बहुतांश भाग दुर्गम अतिदुर्गम आदिवासी बहुल लोकसंख्या असलेला व नर्मदा काठापर्यंत पसरलेला भौगोलिकदृष्ट्या अवघड तालुका आहे. या विधानसभा मतदारसंघातील नर्मदा नदीकाठावरील मनिबेली, चिमलखेडी, डनेल, मुखडी, बामणी, सावऱ्यादिगर, कुडद्या, भादल व भाबरी या अक्कलकुवा अक्राणी तालुक्‍ंयातील नऊ मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना बार्जने निवडणूक केंद्रापर्यंत जावे लागणार आहे.  अक्कलकुवा अक्राणी या विधानसभा मतदारसंघात एकूण ३४९ मतदान केंद्र आहेत. या विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार संख्या दोन लाख  ७७ हजार ९१७  एवढे असून पुरुष मतदार संख्या एक लाख ३९ हजार ८८९  तर स्त्री मतदारसंख्या एक लाख ३८ हजार २८ एवढी आहे. तसेच नवीन मतदारांची संख्या ३३६३ इतकी आहे. अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघात ६१ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ३५०० कर्मचारी नेमण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.   धनखेडी, निंबापाटी व बादल येथील मतदान केंद्रात बदल करण्यात आला आहे. धनखेडी येथील मतदान केंद्र सिमलापाडा, निंबापाटी येथील मतदान केंद्र जिल्हा परिषद शाळेऐवजी अंगणवाडीच्या इमारतीत तर बादल येथे नवीन तात्पुरते शेड मतदान केंद्रासंबंधी तयार करण्यात आले आहे. अक्कलकुवा अक्राणी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुल पाटील तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अक्कलकुवा येथील तहसीलदार हरीश भामरे यांना जबाबदारी दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT