क्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'
क्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो' 
मुख्य बातम्या

क्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'

टीम अॅग्रोवन

नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन दिवस निरीक्षणाची जबाबदारी असलेल्या कृषी खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली जात नसल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी हे काम महत्त्वाचे असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांना मात्र या कामाला ‘खो’ दिला जात आहे.  क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत पूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत निरीक्षण नोंदविण्याचे काम होत होते. नंतर ॲपवर डाटा भरुन तो कृषी विभागाला कळविला जात होता. या माध्यमातून पिकाने नुकसान पातळी गाठली किंवा नाही याचा अंदाज घेत कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून ॲडव्हाझरीद्वारे उपाययोजना सुचवित त्याची अंमबजावणी होत होती. कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत ही कामे होत असल्याने मुख्य प्रवाहातील मोठ्या संख्येने असलेले अधिकारी, कर्मचारी मात्र या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत होते. परिणामी, कृषी विभागाने कंत्राटी कर्मचाऱ्यांऐवजी कृषी सहायकापासून ते विभागीय कृषी सहसंचालकापर्यंत साऱ्यांनाच क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत निरीक्षणाची जबाबदारी सोपविली.  कृषी सहायकांना सोमवार ते बुधवार या तीन दिवसांत निवडलेल्या दोन गावांपैकी एका गावातील दोन फिक्‍स प्लॉट, गुरुवार ते शनिवार या तीन दिवसांतील एका दिवशी उर्वरित गावातील दोन प्लॉटमध्ये निरीक्षण घ्यावे, अशा सूचना आहेत. कृषी पर्यंवेक्षकांनादेखील याच पद्धतीने निरीक्षण घेण्याच्या सूचना आहेत. त्यानंतर असलेल्या मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक यांना  ऐच्छीक पद्धतीने कोणत्याही प्लॉटला भेट देण्याचे स्वतंत्र आहे.   आठवड्यातील दोन दिवस भेट देऊन निरीक्षण घेत त्या नोंदी मोबाईलवर ॲपवर नोंदविणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. परंतु, वरिष्ठ अधिकारी ऐच्छीक कामाकडे कानाडोळा करीत असल्याचे वरिष्ठ कार्यालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. सध्या राज्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. त्यामुळे निरीक्षणाकडे होणारे दुर्लक्ष गंभीर बाब ठरली आहे. १२५० सर्व्हेक्षकांच्या जागी ८ हजारांवर कृषी सहायक पूर्वी १२५० कंत्राटी कीड सर्व्हेक्षकांमार्फत क्रॉपसॅप प्रकल्पाचे कामकाज चालत होते. आता सुमारे ८ हजारांवर कृषी सहायक हे काम पार पाडतात. कृषी सहायकांकडून भरल्या जाणाऱ्या डाटाबाबत कृषी संशोधक संस्थास्तरावर संदिग्धता व्यक्‍त केली जात आहे. त्यामुळे या एका चांगल्या प्रकल्पाच्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : पीकविम्याचे बदल शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे?

Weekly Weather : कमाल, किमान तापमानात वाढ; उष्णतेच्या लाटेची शक्यता

Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

Unseasonal Rain : नगरसह नेवासा, पारनेर, शेवगावमध्ये वादळी पाऊस

Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

SCROLL FOR NEXT