ऑक्टोबर हीटचा चटका वाढतोय
ऑक्टोबर हीटचा चटका वाढतोय 
मुख्य बातम्या

ऑक्टोबर हीटचा चटका वाढतोय

टीम अॅग्रोवन

पुणे: राज्यात बहुतांशी ठिकाणी तापमानच्या पाऱ्याने तिशी पार केली आहे. पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे ढगांचे आच्छादन कमी होऊन ऑक्टोबर हीटचा चटका वाढू लागला आहे. सोमवारी (ता. ३०) विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक ३४.४ अंश सेल्सिअस तापमानाचा नोंद झाली. आज (ता. १) मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कच्छचे आखात आणि परिसरावर असलेल्या ठळक कमी दाबाच्या क्षेत्र सोमवारी (ता. ३०) आणखी तीव्र झाले. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला, तर उर्वरित राज्यात हवामान मुख्यत: कोरडे होते. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, महाबळेश्वर वगळता राज्यात सर्वच ठिकाणी तापमान ३० अंशांच्या पुढे गेले आहे. सकाळपासून जाणवणारा उन्हाचा चटका दुपारी आणखीनच तीव्र होत आहे. पावसाची उघडीप कायम राहिल्यास तापमानात वाढ होणार आहे.

सोमवारी (ता. ३०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २९.३ (-१.२), जळगाव ३३.२(-१.५), कोल्हापूर ३१.३ (१.२), महाबळेश्वर २१.६ (-२.२), मालेगाव ३३.२ (०.७), नाशिक २९.२ (-१.९), सांगली ३१.० (-०.२), सातारा ३०.५ (१.२), सोलापूर ३३.७ (१.३), अलिबाग ३०.७ (-०.१), डहाणू ३१.८ (०.३), सांताक्रूझ ३२.६ (१.१), रत्नागिरी ३१.६ (१.४), औरंगाबाद ३०.० (-१.४), परभणी ३२.९ (०.२), अकोला ३३.३ (-०.१), अमरावती ३०.४ (-१.६), बुलडाणा ३०.२ (-०.२), ब्रह्मपुरी ३४.० (१.२), चंद्रपूर ३४.४(१.०), गोंदिया ३०.०(-३.०), नागपूर ३२.४ (-०.९), वर्धा ३३.० (०.३), यवतमाळ ३२.०(-०.२). 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT